अहमदनगरच्या टपाल कर्मचाऱ्यांचं बाबासाहेबांना अनोखं अभिवादन !

Dr.B.R.Ambedkar Birth anniversary : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti) अहमदनगरमधील टपाल कर्मचाऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे. त्यांनी कुष्ठधाम वृद्धाश्रमामधील बांधवाना मिष्टान्न भोजनाचे आयोजन केले. यावेळी एस.डी. आहेर उपस्थित होते. मतिमंद मुलाची निवासी शाळा तपोवन नगरमध्ये विद्यार्थी यांना अल्पोपहार व डॉ आंबेडकर जीवनगाथा या पुस्तकेचे वितरण करण्यात आले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

Untitled Design   2023 04 14T185259.625

Untitled Design 2023 04 14T185259.625

Dr.B.R.Ambedkar Birth anniversary : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti) अहमदनगरमधील टपाल कर्मचाऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे. त्यांनी कुष्ठधाम वृद्धाश्रमामधील बांधवाना मिष्टान्न भोजनाचे आयोजन केले. यावेळी एस.डी. आहेर उपस्थित होते.

मतिमंद मुलाची निवासी शाळा तपोवन नगरमध्ये विद्यार्थी यांना अल्पोपहार व डॉ आंबेडकर जीवनगाथा या पुस्तकेचे वितरण करण्यात आले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अहमदनगर प्रधान डाकघरमध्ये दिल्ली येथील डायरेक्टर इंटर्नल ऑडिट (IA) पोस्टल डायरेक्टर सौरभ देशमुख यांचे हस्ते प्रतिमा पूजन केले. तर धमाचार्य लक्ष्मण महागडे यांनी भीमवंदना म्हटली.

प्रत्येक जिल्ह्यात शासकीय योजनांची जत्रा, राज्यातील 75 लाख लाभार्थ्यांना होणार थेट लाभ

यावेळी पोस्टल संघटनेचे संतोष यादव, कमलेश यादव, संतोष जोशी व सौरभ देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संदिप कोकाटे, प्रदिप सूर्यवंशी, बापु तांबे, राधाकिसन मोटे, अजित रायकवाड, निशा उदमले, सुनिल भागवत, रमित रोहिला,तान्हाजी सूर्यवंशी,दिपक नागपुरे, अमोल साबळे, बाबासाहेब शितोळे, सुभाष बर्डे, झुंबरराव विधाते, यांच्यासह मोठया संख्येने टपाल कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version