Download App

मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री शिंदेंचा नगर दौरा; पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव पुरस्कार सोहळा उद्या 31 ऑगस्ट रोजी प्रवरानगर येथील धनंजय गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात पार पडणार आहे. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह 97 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष रविंद्र शोभणे उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली आहे.

WhatsApp Image 2023 08 30 At 9.12.59 PM

पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे असणार आहे. तर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी असणार आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विशेष अतिथी म्हणून या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.

या पुरस्कार सोहळ्यात डॉ. निशिकांत ठकार यांचा डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार असून तसेच डॉ. शैलजा बापट यांना यंदाच्या वर्षीचा डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्‍यस्‍तरीय उत्‍कृष्ट साहित्‍य पुरस्‍काराने गौरविण्‍यात येणार आहे. तर विश्वास वसेकर यांच्या कविता संग्रहास विशेष साहित्‍य पुरस्‍काराने गौरविण्यात येणार आहे.

नाबार्ड डेअरी लोन योजना आहे तरी काय? कोणाला, कसा घेता येणार फायदा?

दरवर्षी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचं वितरण करण्यात येते. यंदाच्या वर्षी राज्‍यस्‍तरीय कला गौरव पुरस्‍कार कलेच्‍या सेवेबद्दल वसंत अवसरीकर, समाज प्रबोधन पुरस्‍कार समाज प्रबोधन पत्रिका अशोक चौसाळकर यांना तर नाट्यसेवेबद्दलचा पुरस्‍कार जळगाव येथील शंभू पाटील यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते देण्‍यात येणार आहे.

तसेच डॉ. विखे पाटील अहमदनगर जिल्‍हा साहित्‍य पुरस्‍कार श्रीरामपूर येथील डॉ. शिरीष लांडगे यांच्‍या ज्ञानेश्‍वर दर्शन या ग्रंथास आणि अहमदनगर जिल्‍हा विशेष साहित्‍य पुरस्‍कार विकास पवार यांच्‍या भंडारदरा धरण शतकपुर्ती प्रवास या पुस्‍तकास देण्‍यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रवरा परिसर साहित्‍य पुरस्‍कार कोल्‍हार येथील डॉ. अशोक शिंदे यांच्‍या कविता संग्रहास देण्‍यात येणार असल्‍याची माहिती डॉ. सुजय विखे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यंदाच्य वर्षी पहिल्यांदाच साहित्य पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार असून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जयंती दिन हा ‘शेतकरी दिन’ म्हणून राज्यात साजरा होणार असल्याने हा पुरस्कार सोहळा महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच पुरस्कार सोहळ्याला महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, पुरस्‍कार निवड समितीचे अध्‍यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्‍यासह विविध संस्‍थांचे पदाधिकारी तसेच साहित्‍यप्रेमी, शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Tags

follow us