नाबार्ड डेअरी लोन योजना आहे तरी काय? कोणाला, कसा घेता येणार फायदा?
Govt Schemes : डेअरी फार्मिंग योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना व्याजाशिवाय कर्ज देणे, त्यामुळे ते आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवू शकतील. दुधाच्या उत्पादनास चालना दिल्याने बेरोजगारीच्या प्रमाणात घट होऊन ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
फणा काढाल तर ठेचणारच; महादेव जानकरांचा भाजपला कडक शब्दांत इशारा
अनुदान आणि लाभ :
– अर्जदार दुग्ध उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी उपकरणे खरेदी करणे.
– आपण जर 13.20 लाख रुपयांची मशीन विकत घेतील तर आपल्याला त्यावर 25 टक्के अनुदान म्हणून मिळते. जर आपण मागासवर्गीय प्रवर्गातून असाल तर 4.40 लाख रुपयांचे अनुदान मिळते.
– आपल्याला पाचपेक्षा कमी गायींनी दुग्धशाळा सुरु करायची असेल तर आपल्याला त्यांच्या किंमतींचा पुरावा द्यावा लागेल. त्या अंतर्गत सरकार 50 टक्के अनुदान देईल आणि उर्वरीत 50 टक्के शेतकऱ्यांना स्वतंत्र हप्त्यामध्ये बँकेला द्यावे लागेल.
– दुग्ध उद्योजकता विकास योजनेंतर्गत दुग्ध उत्पादन युनिट सुरु करण्यासाठी या योजनेंतर्गत अनुदान दिले जाईल.
रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले; परीक्षांच्या फीबाबत केली मोठी मागणी
लाभार्थीसाठी पात्रता :
– अर्जदार हा शेतकरी असावा.
– असंघटित क्षेत्र
– उद्योजक
– बिगर सहकारी संस्था
– संघटित गट
– कंपन्या
कर्ज देणाऱ्या बँक कोणत्या?
– राज्य सहकारी कृषी व ग्रामीण बँक
– राज्य सहकारी बँक
– प्रादेशिक बँक
– व्यावसायिक बँक
– अन्य संस्था
दुग्धशाळेसाठी आर्थिक निकष
– चांगल्या जातीच्या एका जनावरांची किंमत –
– दुधाची किंमत प्रति लिटर 32 रुपये
– प्रति किलो हिरव्या चाऱ्याची किंमत – 2 रुपये
– प्रति किलो सुक्या चाऱ्याची किंमत – 5 रुपये
– देखभाल व पशुसंवर्धन खर्च दरवर्षी प्रतियुनिट- दोन हजार रुपये
– संतुलित जनावरांच्या चाऱ्यासाठी प्रतितकिलो किंमत – 20 रुपये
– पशुसंवर्धन बांधकामासाठी प्रत्येक चौरस फुटांची किंमत 250 रुपये
– प्रति बॅग विक्रीतून मिळणारे उत्पन्न – 20 रुपये
योजनेच्या अटी
– योजनेंतर्गत एखाद्या व्यक्तीस सर्व घटकांसाठी मदत मिळू शकते, मात्र तो अर्जदार प्रत्येक घटकासाठी फक्त एकदाच पात्र असेल.
या योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना मदत केली जाऊ शकते.
-त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसह स्वतंत्र युनिट स्थापन करण्यास मदत केली जाते. दोन प्रकल्पामधील कमीत कमी 500 मीटर अंतर असावे.
या योजनेचा एखादी व्यक्ती एकदाच लाभ घेऊ शकते.
संपर्क कुठे साधावा?
आपल्या जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयाला भेट द्यावी.
Office Address: Plot C-24, G Block, Bandra Kurla complex,
BKC Road, Bandra East, Mumbai, Maharashtra 400051
Helpline Number: (022) 26539895/96/99
Email Id: webmaster@nabard.org
टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.