रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले; परीक्षांच्या फीबाबत केली मोठी मागणी
मुंबईः राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात नोकरभरती सुरू करण्यात आली आहे. तलाठीपदाच्या परीक्षा सुरू आहेत. आरोग्य विभागाकडून लवकरच नोकरभरती करण्यात येत आहे. बाह्ययंत्रणेमार्फत या परीक्षा घेतल्या जात आहे. या परीक्षा पारदर्शी घेतल्याचा जात असल्याचा दावा राज्य सरकारचा आहे. परंतु यातील एका परीक्षेसाठी असलेले एक हजार रुपये शुल्क व परीक्षा केंद्र दूर येत असल्याने परीक्षार्थ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या प्रश्नाकडे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी लक्ष घातले आहे. रोहित पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) यांचे आज भेट घेऊन निवेदन दिले.
फडणवीसांची ‘ती’ एक नजरचूक महागात पडणार की सुटका होणार? 5 सप्टेंबरला अंतिम निर्णय
सरळसेवा परीक्षेसाठी एक विद्यार्थी जवळपास पंधराहून अधिक जागेसाठी अर्ज करतो. त्यामध्ये अजून प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे शुल्क असते, असे सर्व एकत्रितरित्या, एका विद्यार्थ्याला जवळपास वीस हजार रुपयापर्यंत हा खर्च जातो. त्यामुळे सरळसेवा परीक्षेसाठी आकारले जाणारे एक हजार रुपये परीक्षा_शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नाही, असे रोहित पवारांचे म्हणणे आहे.
राजस्थानच्या धर्तीवर एकाच वेळी नोंदणी पद्धत सुरू करण्याची किंवा यूपीएससी प्रमाणे सरसकट 100 रुपये परीक्षा शुल्क आकारण्याची विनंतीही रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
#सरळसेवा परीक्षेसाठी एक विद्यार्थी जवळपास 15 हून अधिक पोस्टसाठी अर्ज करतो,त्यामध्ये अजून प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी असते, असं सर्व एकत्रितरित्या ,एका विद्यार्थ्याला जवळपास 20000 ₹ पर्यंत हा खर्च जातो.त्यामुळे सरळसेवा परीक्षेसाठी आकारले जाणारे 1000 रु #परीक्षा_शुल्क… pic.twitter.com/z6DOissBso
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 29, 2023
परीक्षार्थ्यांना मोफत बस प्रवास द्या
सध्या तलाठी भरतीसाठी लाखोंचे अर्ज आले आहे. त्यामुळे परीक्षा केंद्र हे विद्यार्थ्यांच्या शहर, गावापासून दूर येत आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र दूरचे मिळत असल्याने प्रवासाचा मोठा आर्थिक भार विद्यार्थ्यांवर येत आहे. हा भार कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी एसटी बसचा मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यासंदर्भात देखील चर्चा झाली असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.