Download App

एक बटण दाबलं तर… हनीट्रॅप अन् गिरीश महाजनांबाबत खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Kadaseप्रफुल्ल लोढा हा अगोदर एक सामान्य कार्यकर्ता होता. नंतर त्याचे गिरीश महाजन आणि इतर राजकारण्यांशी संबंध आले.

Eknath Kadase on Honey Trap secret explosion about Politions : जामनेरचे प्रफुल्ल लोढा यांना पोक्सो अंतर्गत अटक झाली आहे. ते भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे निकटर्तीय आहेत. ही धक्कादायक घटना असून याची एसआयटी मार्फत चौकशी करावी. तसेच हे हनीट्रॅप पेक्षा वेगळे प्रकरण असून यात अधिकारी नव्हे तर राजकारणी असल्याचा सनसनाटी आरोप करून आमदार एकनाथ खडसे (Eknath Kadase) यांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे.

मोक्काचे आरोपी भाजपला चालतात? रविंद्र चव्हाण म्हणाले, राष्ट्रीयत्व जागं असलेले सर्वजण…


नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?

प्रफुल्ल लोढा हा अगोदर एक सामान्य कार्यकर्ता होता. नंतर त्याचे गिरीश महाजन आणि इतर राजकारण्यांशी संबंध आले. त्यातून तो 50-60 कोटींचा मालक झाला आहे. मात्र बराच काळ एकत्र राहिल्यानंतर महाजन आणि लोढामध्ये दुरावा आला. तेव्हा लोढांनी महाजनांना खालच्या भाषेत टीका करत होते. त्यावेळी लोढा यांचे व्हिडीओ समोर आले होते. त्यात ते म्हणाले की, मला ब्लॅकमेल करू नका नाही तर मी पोलिसांमध्ये तक्रार दाखल कलेली आहेच पण जर मी एक बटण दाबलं तर सगळं समोर येईल. तसेच ट्रायडंट हॉटेलला तुम्ही माझे कसे पाय चाटत होते हे मी सगळ्या जगाला सांगेल. त्यानंतर लोढाला भाजपमध्ये प्रवेश दिला गेला. त्यामुळे जर लोढा आणि महाजन यांच्यामध्ये आता एवढी जवळीक कशी काय निर्माण झाली. त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी काय आली? हे सर्व पैसे लोढाला ब्लॅकमेलिंगमधून मिळाले का? याची चौकशी व्हायल हवी. (Eknath Kadase on Honey Trap secret explosion about Politions)

आता त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात एक गुन्हा पोक्सो अंतर्गत आहे. तसेच त्याला अटक झाली आहे. अशा माणसाला भाजपमध्ये घेणे तेही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे कितपत योग्य आहे. त्यामुळे हनी ट्रॅपिंगचं जे प्रकरणं समोर आलं आहे. ते अधिकाऱ्यांचं नसून ते राजकारण्यांचं आहे. असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे.

follow us