Download App

त्यांना अजित दादांना ताकद दाखवायचीय पण दुर्दैवाने… ; खडसेंचा अनिल पाटलांना टोला

Eknath Khadase : मंत्री अनिल भाईदास पाटील हे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत की ते अजित पवार यांच्या सोबत आहेत. त्यामुळे स्वभाविक त्यांना जोडीदार हवा आहे. म्हणून ते प्रत्येकाला अजित पवारांसोबत येण्याचं आवाहन करत आहेत. तसेच याचा अर्थ असा आहे की, अजित पवार यांच्यासोबत जळगाव विभागातील कुणी गेलेलं नाही. ( Eknath Khadase Criticize Anil Patil for His Appeal come with Ajit Pawar Group )

…म्हणून आई-वडिलांची शपथ घ्यावी लागते; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा

त्याचबरोबर पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे. अजित दादांना त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की, माझ्यासोबतही मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न दिसतो आहे. पण दुर्दैवाने अजून तरी त्यांना कोणी प्रतिसाद देत नाही. असे उत्तर मंत्री अनिल पाटील यांच्या अजित पवार यांच्या गटात सहभागी होण्याच्या आवाहनावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

राजू शेट्टींच्या मुलाची वरात ट्रॅक्टरवरून विवाहस्थळी दाखल, पाहा फोटो

पुढे खडसे असं म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणीही बडे नेते नव्हते मी भाजपमधून नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो स्वतः अनिल पाटील हे सुद्धा भाजपच होते. तर गेल्या काळात जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष प्रत्येकापर्यंत पोहोचला संघटन मजबूत झालं. मात्र 2019 नंतर निवडणुका झाल्याच नाही. आता आगामी निवडणुकांमध्ये कोणाची ताकद किती आहे हे कळेल असे आव्हान सुद्धा एकनाथ खडसे यांनी मंत्री अनिल पाटील यांना दिलं आहे.

त्याचबरोबर यावेळी त्यांनी अलीकडचं काँग्रेसचं वातावरण पाहता तसेच कर्नाटक मधला विजय लक्षात घेता, काँग्रेस मधून कोणी राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांमध्ये जाईल अशी स्थिती मला तरी वाटत नाही. उलट काँग्रेसमुळे अनेकांच्या अशा पल्लवीत झाली आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना राष्ट्रवादी किंवा भाजप मधून कोणी काँग्रेसमध्ये गेलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. असं देखील म्हटलं आहे.

Tags

follow us