Download App

शेतकरी, कष्टकरी देणार मुख्यमंत्री शिंदेंना टक्कर

नाशिक : आपल्या हजारो मागण्यांसाठी शेतकरी (Farmer), कष्टकरी, आदिवासी बांधवांनी लॉंगमार्चला (Long march)दोन दिवसांपासून सुरुवात केली आहे. नाशिकच्या (Nashik) दिंडोरी परिसरातून या लॉंगमार्चला सुरु झाला आहे. नाशिक येथे मुक्काम केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या (Mumbai) दिशेनं कूच केली. त्यानंतर या कष्टकरी शेतकऱ्यांनी दुसरा मुक्काम वाडीवऱ्हे या ठिकाणी केला. दिवसभर पायी चालून हे कष्टकरी वाडीवऱ्हे (Wadivarhe)या ठिकाणी मुक्कामाला थांबले होते. यावेळी शेतकरी कष्टकरी म्हणाले की, आमच्या वनजमिनीसाठी नाशिमधून मुख्यमंत्र्यांना टक्कर देण्यासाठी निघालो आहोत. आम्ही चांदवड तालुक्यापासून पायी चालत निघालो आहोत. दरम्यान पहिला मुक्काम नाशिकमध्ये केला तर दुसरा मुक्काम रात्री वाडीवऱ्हे या ठिकाणी केला आहे. शेतकऱ्याच्या मागण्या आणि वनजमिनीच्या मागण्यांसाठी सर्वांनी लॉंगमार्च काढला आहे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टक्कर देण्यासाठी निघाले असल्याचंही यावेळी शेतकऱ्यांनी सागितलं.

आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी निघालो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरुन रास्तारोको करणार असल्याचा थेट इशाराच यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी शेतकरी म्हणाले की, कायद्याप्रमाणे आम्हाला त्या जमिनी मिळणं अपेक्षित आहे पण सरकारकडून त्या आम्हाला दिल्या जात नाहीत.

Sheetal Mhatre : व्हायरल व्हिडीओप्रकरणी आदित्य ठाकरेंना धक्का

गेल्या 20 ते 25 वर्षांपासून आम्ही ती शेती करत आहोत. आम्ही एवढ्या वर्षांपासून कष्ट करुन घाम गाळून त्या वनजमिनी शेतीयोग्य बवल्या आहेत. आज त्या जमिनी आमच्या नावावर करण्यास सरकारला काय अडचण आहे? असा सवालही यावेळी शेतकऱ्यांनी सरकारला केला आहे.

आता आम्ही थेट मुंबईलाच जाणार आहोत, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठकीसाठी बोलावलं आहे. त्यामध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्या तर ठिक आहे नाहीतर आम्ही मुंबईला धडक देणार असल्याचं शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं आहे.

Tags

follow us