Sheetal Mhatre : व्हायरल व्हिडीओप्रकरणी आदित्य ठाकरेंना धक्का

Sheetal Mhatre : व्हायरल व्हिडीओप्रकरणी आदित्य ठाकरेंना धक्का

मुंबई : शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre)आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve)यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल (Viral Video) केल्याप्रकरणी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना धक्का बसला आहे. कारण आदित्यचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि ठाकरे गटाचे सोशल मीडिया प्रमुख साईनाथ दुर्गे (Sainath Durge)यांना दहिसर पोलिसांकडून (Dahisar Police)अटक करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी त्यांना मुंबई विमानतळावरुन (Mumbai Airport)पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ठाकरे गटाच्या अधिकृत सोशल मीडियाच्या अकाउंटवरून शीतल म्हात्रे आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानं त्यामध्ये साईनाथ दुर्गे यांचा सहभाग असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. त्यामुळं पोलिसांनी दुर्गेंना अटक केली आहे.

आज साईनाथ दुर्गेंना न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ व्हायरल करण्यात साईनाथ दुर्गेंसह आणखी कोणाचा हात आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. सोमवारी त्यांना मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे.

Ajit Pawar यांनी सरकारची फसवेगिरी आणली चव्हाट्यावर : मुद्दा क्रमांक १२६ अन् १६५ बद्दल काय बोलले?

साईनाथ दुर्गे हे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे मित्र मानले जातात. दुर्गेंना अटक होणं हा आदित्य ठाकरेंना एक प्रकारे मोठा धक्काच मानला जात आहे. दुर्गे हे युवासेनेचे नेते असून ते मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे माजी सदस्यही होते.

शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओप्रकरणी आत्तापर्यंत सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पोलिसांनी दुर्गेंसाोबतच विनायक डावरेंनाही ताब्यात घेतलं आहे. डावरे हे मातोश्रीचं पेज ऑपरेट करत होते. हा व्हिडीओ रवींद्र चौधरींनी विनायक डावरेंना व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी दिल्याची पोलिसांकडं माहिती आहे. शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रेंनी त्यांचा एक व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा आरोप केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube