Download App

सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; बस थेट 400 फूट दरीत कोसळली

Nashik Accident News : नाशिकच्या सप्तश्रृंगीगड घाटात (Saptshringi Gad Ghat) बसचा भीषण अपघात झाला आहे. गणपतीटप्प्यावरुन बस घाटात कोसळ्याची प्राथमिक माहिती मिळत असून अपघातात एका महिलेचा (नाव कळू शकले नाही) मृत्यू झाला आहे. या बसमध्ये 23 प्रवासी प्रवास करत होते. 11 रुग्ण वणी शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 11 रुग्ण नाशिक येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी शिफ्ट केले आहेत.

सप्तश्रृंगीगड ते खामगाव (बुलढाणा) या मार्गावरील बसला अपघात झाला आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सप्तश्ऱंगीगडावर रात्री ही बस मुक्कामी असल्याचे समजते. सप्तश्रृंगी गडवरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरु आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे घटनास्थळाकडे पोहचले आहेत.

16 प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुळी या गावचे असून गडावरील 4 प्रवासी आहेत. इतर 2 बस चालक व कंडक्टर तर 1 नाव अद्याप कळले नाही. अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल काल सकाळी 8.30 वा. ही बस सप्तश्रृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तश्रृंगी गड ते खामगाव असा बसचा प्रवास सुरु झाला होता. वणीच्या सप्तश्रृंगी गडावरुन खाली येत असलेल्या बसला मोठा अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे.

ट्रकने चिरडून 50 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे पाच लाखांचे नुकसान

सप्तश्रृंगी घाटात एसटी बस अपघात झाला आहे. त्याची माहिती घेतली असून संबंधीत यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

Tags

follow us