अहमदनगर – सोशल मीडियाचा अतिरेक आता घटक ठरू लागला आहे. यातच सध्या आजकालची तरुणाई सोशल मीडियाचा वापर चांगल्या कमी, तर वाईट कामासाठी जास्त करू लागली आहे. सोशल मीडियावर मैत्री करून फूस लावल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. असाच काहीसा मैत्री, प्रेम आणि धोक्याचा प्रकार प्रकार नगर जिल्ह्यात (Ahmednagar Police) घडला. अठरा वर्षे पुर्ण झालेल्या दोन मुलींची इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी ओळख झाली. दोन्ही मुलींनी थेट घरातून पळून जात परराज्य गाठले. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने त्या मुली आपल्या घरी परतल्या. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना मुलांना आणि पालकांना विचार करायला लावणारी आहे.
सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन : लोकसभेपूर्वी PM मोदींचे गुजरातला सर्वात मोठे गिफ्ट
अधिक माहिती अशी, अठरा वर्षे पुर्ण झालेल्या दोन मुलींची इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी ओळख झाली. त्यांच्यामध्ये प्रथम मैत्री झाली अन् मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या मैत्रीतून दोघींनी थेट घर सोडले व परराज्य गाठले. मुलींच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनतर पोलिसांनी देखील अलर्ट होत तातडीने हालचाली सुरु केल्या.
उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप : प्रसिद्ध अभिनेत्रीकडून तक्रार दाखल
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनातून कोतवाली पोलिसांनी एका मुलीला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवरून आणले. तर दुसऱ्या मुलीला मराठवाड्यातून आणले. सोशल मिडीयावर झालेले प्रेम,मैत्री हे मृगजळासारखे असते. दिखाव्याच्या खोट्या गोष्टींमध्ये गुंतवून मुलांकडून जाळ्यात फसवले जाते. अशा दिखाव्याला मुली बळी पडतात.
पालकांनी आपल्या पाल्यांवर कायम लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाबाबत वेळोवेळी संवाद साधावेत. पालकांचे आपल्या पाल्याची मैत्रीपूर्ण संबंध असावेत. मुलांमध्ये फक्त भीती नको तर, आदरयुक्त भीती असावी. पालकांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याचे भावनिक आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान विश्वास गाजरे, रवी टकले, प्रमोद लहारे, सचिन लोळगे आदींनी केली आहे.