उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप : प्रसिद्ध अभिनेत्रीकडून तक्रार दाखल

उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप : प्रसिद्ध अभिनेत्रीकडून तक्रार दाखल

मुंबई : उद्योगपती आणि जेएसडब्ल्यू ग्रुपचे (JSW Group) व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल (Sajjan Jindal) यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईतील बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. जानेवारी 2022 मध्ये वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जेएसडब्ल्यू कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या वर असलेल्या पेंटहाऊसमध्ये हा प्रकार घडला असल्याचा दावा या अभिनेत्रीने तक्रारीत दाखल केला आहे. यापूर्वी याप्रकरणी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बीकेसी पोलिसांनी तक्रारीकडे लक्ष दिले नाही त्यामुळे आपल्याला न्यायालयात जाणे भाग पाडले, असाही आरोप अभिनेत्रीने केला आहे. (A complaint of rape was registered against Sajjan Jindal, managing director of the JSW Group)

याबाबत अभिनेत्रीने तक्रारीत दिलेल्या अधिक माहितीनुसार, ऑक्टोबर 2021 मध्ये तिची सज्जन जिंदाल यांच्याशी दुबईमध्ये आयपीएलची (IPL) मॅच पाहताना स्टेडियमच्या व्हीआयपी बॉक्समध्ये पहिली भेट झाली. त्यानंतर ते जयपूरमध्ये खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नात भेटले. या दोन भेटीनंतर जिंदाल वैयक्तिक भेटींसाठी विचारणा करु लागले. त्यावेळी नंबर्सची देवाणघेवाण केली आणि मुंबईमध्ये भेटले. या भेटीत त्यांनी दुबईमध्ये रिअल इस्टेट सल्लागार असलेल्या अभिनेत्रीच्या भावाकडून मालमत्ता खरेदी करण्यास स्वारस्य दाखविले.

‘उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली नसती तर अजितदादांनाही सोबत घेतलं नसतं’; तावडेंचा खळबळजनक दावा

त्यानंतर जिंदाल यांनी हळू हळू “बेबी, बेबी” म्हणण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा एकटे भेटलो तेव्हा त्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणी माझ्याशी शेअर केल्या. त्या ऐकून आपल्याला खूप वेदना झाल्या. त्यानंतर त्यांच्याबाजून मिठी मारणे आणि फ्लर्ट करणे यांसारख्या प्रकार होऊ लागले. या प्रकारामुळे अनेकदा अवघडल्यासारखेही वाटे. त्यानंतर मेसेजेसवर जिंदाल यांनी आपल्याबद्दल रोमँटिक भावना व्यक्त केल्या. मला किस करण्याची आणि शारीरिक जवळीक साधण्याबद्दल इच्छा व्यक्त केली, असाही खळबळजनक दावा अभिनेत्रीने तक्रारीत केला आहे. पण जे काही असेल ते लग्नानंतरच होऊ शकते असे मी त्यांना स्पष्टपणे सांगून टाकले, असेही तिने स्पष्ट केले.

दरम्यान, जानेवारी 2022 मध्ये अभिनेत्री कंपनीच्या मुख्यालयात मीटिंगसाठी गेली होती. तेव्हा जिंदाल आपल्याला पेंटहाऊसमध्ये घेऊन गेले. त्यावेळी आपण सतत विरोध केल्यानंतर आणि नकार दिल्यानंतरही त्यांनी आपल्यावर जबरदस्ती केली. या घटनेनंतरही आपण त्यांच्याशी मैत्री जपण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने तिला प्रतिसाद देणे बंद केले आणि नंतर नंबरही ब्लॉक केला. जून 2022 मध्ये माझा नंबर ब्लॉक करण्यापूर्वी, मी पोलिसांकडे गेल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी मला दिली. फेब्रुवारी 2023 मध्ये धाडस करुन बीकेसी पोलिसांकडे लेखी तक्रार केली.

खोके घेऊन अदानी कधी जाणार आता मातोश्रीच्या दारात ? शेलारांची ठाकरेंवर खरमरीत टीका

पण त्यावेळी वारंवार केलेल्या तक्रारींकडे पोलिसांनी लक्ष दिले नाही, म्हणूनच न्यायालयात धाव घेणे गरजेचे पडले. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना तक्रार नोंदवण्याचे आदेश दिले आहेत, असेही ती म्हणाली. बीकेसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या तक्रारीच्या आधारे आरोपीवर कलम 376 (बलात्कार), 354 (महिलेवर प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर, तिचा विनयभंग करण्याच्या हेतूने) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube