Finally, a medical college will be set up in the district hospital Ahilyanagar ; a break to the Vikhe-Lanka conflict : केंद्र सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली व आता हे महाविद्यालय कोठे उभारण्यात येणार यावरून आता राजकारण पेटणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. मात्र अखेर अहिल्यानगरचे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सध्याच्या जिल्हा रुग्णालयातच होणार असण्यावर शिक्का मोर्तब झालं आहे. त्यामुळे या वादाला काहीसा पुर्ण विराम मिळाला आहे.
6 जूनचा राज्याभिषेक बंद करा म्हणणारा नक्कीच पिसाळलेला! अमोल मिटकरींचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल
अहिल्यानगरचे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सध्याच्या जिल्हा रुग्णालयातच होणार. असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सात वर्षांपर्यंत सामान्य रुग्णालयाची जागा, इमारत वगैरे या महाविद्यालयासाठी मोफत देण्यात येणार. 100 विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि 400 खाटांचे रुग्णालय होणार. महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव. खर्चाच्या मंजुरीसह जी. आर. निघाल्याने लवकरच काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा. महाविद्यालयाची कायम स्वरूपी जागा मंत्री उपसमिती ठरविणार आहे. त्यानंतर स्थलांतर बांधकाम खर्च वगैरेलाही मंजुरी देण्यात आलेली आहे.
मेडिकल कॉलेजचं क्रेडिट वॉर, विखे-लंके वादाची वात पेटली
केंद्र सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली व आता हे महाविद्यालय कोठे उभारण्यात येणार यावरून आता राजकारण पेटणार असे चित्र सध्या निर्माण झाले होते. या मेडिकल कॉलजेसाठी अहिल्यानगरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी पाठपुरावा केला असल्याचे ते म्हणतायत. तसेच हे कॉलेज नगर शहराच्या जवळपासच झाले पाहिजे असाही त्यांचा आग्रह होता.
भारताकडून ऑपरेशन सिंदूर थांबल का?, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचं एका वाक्यात उत्तर
मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री हे कॉलेज जिल्ह्यातील उत्तरेकडे म्हणजेच शिर्डीकडे घेऊ जाऊ इच्छित आहे असा दावा लंकेकडून केला जात होता. यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील विखे-लंके संघर्षाच्या वादाला आता मेडिकल कॉलजेची किनार मिळतेय कि काय व येणाऱ्या काळात हाच मुद्दा संघर्षाचा ठरणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या वादाला काहीसा पुर्ण विराम मिळाला आहे.