Download App

Ahmednagar News : …म्हणून मनसेकडून अहमदनगरमधून पाठवला जम्मूमध्ये तिरंगा ध्वज

Ahmednagar News : नेहमी नागरिकांच्या, जनतेच्या समस्यांसाठी अग्रेसर असलेली अहमदनगर शहरातील मनसे आपल्या एका कारणामुळे चर्चेत आहे. नगरचे काही मनसैनिक हे जम्मूमध्ये गेले होते. यावेळी त्यांना तिथे एका उद्यानात भारताचा तिरंगा ध्वज हा जीर्ण झालेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावेळी त्यांनी तो बदलण्याचा प्रयत्न केला मात्र तो ध्वज घट्ट बांधला असल्याने निघाला नाही. मात्र अस्वस्थ झालेल्या मनसैनिकांनी तातडीने जम्मूमधील प्रशासनाशी संपर्क केला व या ध्वजाबाबत माहिती दिली. तसेच मनसेने तातडीने आपल्या नगरच्या मनसैनिकांना याबाबत कळवून थेट नगरहून जम्मूकडे भारताचा तिरंगा ध्वज हा कुरिअरद्वारे मागवला. तसेच हा तिरंगा संबंधित ठिकाणी लावण्यात यावा अशी विनंती प्रशासनाला देखील केली. ( For this reason MNS sends Tiranga Flag for Jammu from Ahmednagar )

‘शरद पवार असं काम करत नाही’; धमकीच्या फोननंतर भुजबळांची प्रतिक्रिया

प्रत्येकाच्या मनात आपल्या देशाविषयी आत्मीयता असते. देशाविषयी असलेले प्रेम जगाच्या कोणत्याही ठिकाणी आपण असो मात्र हे प्रेम कायम राहते. याचाच प्रत्यय नगरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यामधून आल्याचे दिसून आले. नेमकं घडलं असं की, मनसेचे नगरचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा हे आपल्या काही कार्यकर्ते आणि मित्रांसोबत अमरनाथ यात्रेला दर्शनासाठी गेले होते.

शिंदे सरकारसाठी सर्वात मोठी गुडन्यूज! 12 आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा; SC ने स्थगिती उठवली

दर्शनानंतर माघारी निघालेल्या असताना त्यांनी जम्मूमध्ये मुक्काम केला होता. त्यावेळी तेथील ‘बाग ए बाहू’ या उद्यानात ते फिरण्यासाठी गेले असता त्यांना तिथे जीर्ण अवस्थेतील भारताचा तिरंगा ध्वज पहायला मिळाला. तिरंग्याची अशी अवस्थता पाहता अस्वस्थ झालेल्या मनसैनिकांनी तिरंग्याचा अवमान नको, म्हणून त्यांनी तो त्याठिकाणाहून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो घट्ट बसविलेला असल्याने निघाला नाही. त्यामुळे सुमित वर्मा यांनी तो गुंडाळून ठेवला. तसेच याबाबतची माहिती त्याठिकाणच्या प्रशासनाला तातडीने दिली.

वर्मा यांनी एवढ्यावरच न थांबता याठिकाणी घडलेल्या प्रकारची माहिती आपल्या नगरच्या कार्यकर्त्यांनाही कळविली. या उद्यानातील तिरंगा बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला व सोबतच याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधायला हवे, यासाठी त्यांनी थेट नगरहून जम्मूला झेंडा पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जम्मूमधील संबंधित उद्यानाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक शोधून काढत त्यांना उद्यानातील तिरंगा ध्वज खराब झाल्याची माहिती दिली. सोबतच आम्ही तेथे लावण्यासाठी नगरहून तिरंगा ध्वज कुरिअरने पाठवित आहोत. तो आपल्यापर्यंत पोहच झाल्यास आपण तातडीने हा तिरंगा ध्वज बदलून त्याजागी नवा ध्वज सन्मानपूर्वक बसवावा, अशी विनंती केली.

Tags

follow us