‘शरद पवार असं काम करत नाही’; धमकीच्या फोननंतर भुजबळांची प्रतिक्रिया
NCP Leader Chhagan Bhujbal : अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंड करत भाजपसोबत युती केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतर नऊ नेत्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या बंडात त्यांना साथ देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आता जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी महाडमधून एकाला ताब्यात घेतले आहे. ( NCP Leader Chhagan Bhujbal Death Threat )
यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस काळजी घेत आहे. तसेच पवार कुटुंबीय कधीही असे काम करत नाही. शरद पवार देखील असं काम करत नाही. ते आपली वैचारिक लढाई करत असतात. भाषणं देत असतात. काही अतिउत्साही लोाकांमुळे अशा धमक्या येत असतात, असे भुजबळ म्हणाले.
वर्षावर शिंदे-फडणवीस अन् पवारांमध्ये तीन तास खलबतं; खाते वाटपाचा तिढा सुटणार?
मला छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली आहे. मी सांगून काम करतो म्हणून फोन केला. अशी धमकी पाटील याने भुजबळांच्या कार्यालयातील व्यक्तीला फोन करून दिली. भुजबळ यांना प्रशांत पाटील याने दारूच्या नशेत ही धमकी दिली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले असून पाटील हा मूळचा कोल्हापूर येथील आहे. या धमकीच्या फोननंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाटील याला महाड येथून ताब्यात घेतले असून पाटील संदर्भातील पुढील तपास पुणे पोलीस करीत आहेत.
उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या नावाला ‘कलंक’, फडणवीसांचं नाव घेण्याची लायकी नाही; तुषार भोसलेंचा निशाणा
दरम्यान, छगन भुजबळ यांनी अजित पवारांसोबत जाण्याच्या निर्णय घेतल्याने शरद पवार गटाकडून त्यांच्यावर तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. शरद पवार यांनी छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात सभा देखील घेतली. त्यानंतर छगन भुजबळांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधला होता. पण भुजबळांनी त्यांना आलेल्या धमकीवर शरद पवार अस करणार नाही, असे म्हटले आहे.