धक्कादायक! शिर्डीतील चार भिक्षुकांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू; नातेवाईकांचे प्रशासनावर गंभीर आरोप

Ahilyanagar जिल्हा रुग्णालयात शिर्डी येथील भिक्षुकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

Letsupp Marathi (13)

Letsupp Marathi (13)

Four beggar die in Ahilyanagar district hospital of Shirdi : शिर्डी येथून ताब्यात घेतलेल्या भिक्षुकी (बेघर) यांना विसापूर येथील भिक्षेकरीगृहात ठेवण्यात आले होते. त्यातील 10 जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना तेथील वैद्यकीय अधिकारी तुरुकमारे यांनी उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी चार जणांचा दोनच दिवसांत मृत्यू झाला आहे. त्यातील एक जण काल (ता. 7) तर तीन जणांचा आज (ता. 8) मृत्यू झाला आहे. तीन जण पसार झाल्याचे समजते. उर्वरितांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्रिसदस्य चौकशी समिती नेमली आहे. 

पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण; ‘चित्रपताका’ नावाने होणार महोत्सव

मागील महिन्यापासून शिर्डी येथील भिक्षुकी (बेघर) यांची पोलीस प्रशासनाकडून धरपकड सुरू आहे. त्यांना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात दाखल करण्यात येते आहे. मागील चार दिवसांपूर्वी  शिर्डी येथून 49 भिक्षुकांना विसापूर येथील भिक्षेकरीगृहात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी (ता. 5) रोजी त्यांची वैद्यकीय तपासणी केली.

रोहित पवारांना अविश्वास प्रस्ताव मान्य, त्यांनी शब्द पाळला नाही; राम शिंदेंचा हल्लाबोल

त्यावेळी सात जणांची प्रकृती चिंताजनक झाल्याने वैद्यकीय अधिकारी तुरुमकर यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.  त्यातील एकाचा सोमवारी (ता. 7) तारखेला मृत्यू झाला. तर आज (ता. 8) रोजी तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये अशोक मन्साराम बोरसे (वय 35), सारंगधर मधुकर वाघमारे (वय 48, रा. राहाता), प्रवीण अण्णा घोरपडे (वय 48), इस्सार अब्दुल शेख (38) असे मयत व्यक्तींची नावे आहेत. मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

Exit mobile version