रोहित पवारांना अविश्वास प्रस्ताव मान्य, त्यांनी शब्द पाळला नाही; राम शिंदेंचा हल्लाबोल

Ram Shinde On Rohit Pawar : कर्जत नगरपंचायतीत राजकीय भूकंप आला असून एकाच वेळी महाविकास आघाडीचे 13 नगरसेवक सहलीवर गेल्याने

Ram Shinde On Rohit Pawar

Ram Shinde On Rohit Pawar : कर्जत नगरपंचायतीत राजकीय भूकंप आला असून एकाच वेळी महाविकास आघाडीचे 13 नगरसेवक सहलीवर गेल्याने अविश्वास ठराव मांडण्यात येत आहे. त्यामुळे रोहित पवार (Rohit Pawar) यांना आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी मोठा राजकीय धक्का दिला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर आता या प्रकरणात राम शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते आज मुंबईत (Mumbai) माध्यमांशी बोलत होते.

यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले की, अहिल्यानगर येथील कर्जत- जामखेड नगरपरिषदेची निवडणूक 3 वर्षांपूर्वी पार पडली होती आणि या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसला 15 जागा तर भाजपाला 2 जागा मिळाल्या होत्या. मात्र त्यापैकी 11 सदस्य तीन दिवसांपासून सहलीवर गेले आहे आणि आमचे 2 सदस्य त्यांना जॉईन झाले आहे. आज 13 सदस्य अर्थात नगरसेवक भेटायला आले आहेत. त्यांच्याशी विस्तृत चर्चा झाली असं माध्यमांशी बोलताना राम शिंदे म्हणाले. तसेच वेगवेगळ्या कारणाने नगरसेवकांनी हा उठाव केला आहे असेही यावेळी राम शिंदे म्हणाले.

आरोग्य विभागाला जाग, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात कारवाईला सुरुवात

पुढे बोलताना राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी शिंदे म्हणाले की, 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. याबाबत या बैठकीत चर्चा झाली. जे तिकडे नेतृत्व करत आहेत ते काहीही बोलत नाहीत. ते अपयशी ठरले आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही अशी टीका राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर केली. तसेच या क्षणापर्यंत रोहित पवार काहीही बोलले नाही याचा अर्थ त्यांना हे मान्य केले आहे. असं देखील यावेळी राम शिंदे म्हणाले.

माजी आयपीएस शिवदीप लांडे राजकारणात; ‘हिंदू सेना’ पक्षाची स्थापना

follow us