राम शिंदेंच्या गुगलीवर रोहित पवार क्लीन बोल्ड…, निवडणुकीतील पराभवाचा घेतला बदला

राम शिंदेंच्या गुगलीवर रोहित पवार क्लीन बोल्ड…, निवडणुकीतील पराभवाचा घेतला बदला

Rohit Pawar : राज्यामध्ये नगर जिल्ह्यतील कर्जत- जामखेड मतदारसंघ हा एक हायव्होल्टेज ड्रमा म्हणून चर्चित आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासूनच या ठिकाणी राष्ट्रवादीचे (NCPSP) रोहित पवार (Rohit Pawar) व भाजपचे (BJP) राम शिंदे (Ram Shinde) यांच्यामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. 2019 व 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवार यांनी शिंदेंना धोबीपछाड देत आमदारकीला गवसणी घातली. नवख्या तरुणाने पराभवाची धूळ चाखवली मात्र या  पराभवानंतर देखील शिंदे यांनी हार मानली नाही.

पक्षाशी असलेली एकनिष्ठता शिंदेंच्या कामी आली व विधानसभा निवडणुकींमधील पराभवानंतर देखील राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाली. निवडणुकींमधील पराभवाचा बदला आता शिंदे यांनी रोहित पवार यांची एक हाती सत्ता असलेल्या कर्जत नगर पंचायतीमध्ये सुरुंग लावत घेतला.

रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेकडून सुरुंग

कर्जत – जामखेडमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा राजकीय सामना हा सर्वानाच परिचित आहे. विधानसभा निवडणुकीत देखील पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे यांना पराभवाची धुळ चाखवली मात्र आता शिंदे यांनी थेट रोहित पवार यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. कर्जत नगरपंचायतीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ नगरसेवक व काँग्रेसच्या तीन नगरसेवकांची विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासोबत रविवार रात्री गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत कर्जत नगरपंचायतीत लवकरच खांदेपालट होण्याचे संकेत देण्यात आले आहेत त्यामुळे आमदार रोहित पवार यांना धक्का मानला जात आहे.

कर्जतमध्ये नेमकं काय घडलं?  

आमदार रोहित पवार यांनी कर्जत नगरपंचायतीमध्ये एक हाती सत्ता मिळवत भाजप आमदार राम शिंदे यांच्या सत्तेला सुरुंग लावला होता. कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12 तर काँग्रेसचे तीन आणि भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या. उषा राऊत यांची नगराध्यक्षपदी तर काँग्रेसच्या रोहिणी घुले या उपनगराध्यक्ष होत्या.  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र एकाच कुटुंबाकडे पदे जात असल्याने नाराजीचा सुरू समोर येऊ लागला व रोहित पवार यांच्याविषयी संतापाची भावना समोर आली. यातच या सर्व नगरसेवकांनी नगर पालिकेच्या अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. यामुळे रोहित पवारांना राजकीय धक्का देत हे सर्व नगरसेवक भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे. एक अर्थी रोहित पवार यांना धक्का देत शिंदे यांनी विधानसभा निवडणुकींमधील पराभवाचा बदलाचं घेतला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

फडणवीसांचे विश्वासू व पक्षाशी असलेली एकनिष्ठता कामी आली

कर्जत – जामखेडमध्ये दोन पंचवार्षिक म्हणजेच 2019 व 2024 मध्ये राम शिंदे यांच्याविरोधात भाजपकडून राम शिंदे यांना मैदानात उतरवण्यात आले होते. 2019 मध्ये रोहित पवार यांनी शिंदे यांचा पराभव करत पहिल्यांदा आमदारकीला गवसणी घातली. मात्र पराभूत झाल्यानंतर देखील शिंदे यांना पक्षनिष्ठता कामी आली.  भाजपने शिंदे यांना विधानपरिषदेवर घेतले. त्यानंतर 2024 च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध पवार असा सामना झाला. मात्र अवघ्या थोड्याश्या फरकामुळे पुन्हा एकदा शिंदे यांचा पराभव झाला. मात्र यावेळी देखील शिंदे यांची पक्षाशी असलेली बांधिलकी व जोडलेली नाळ पाहता त्यांचे पुनर्वसन केले. फडणवीसांची निकटवर्तीय व विश्वासू समजले जाणारे शिंदे यांना थेट विधान परिषदेच्या सभापती त्यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणुकींमधील पराभवाचा बदला घेतला

राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा राजकीय संघर्ष आजवर पाहायला मिळाला. आता शिंदे हे जरी विधान परिषदेचे सभापती झाले आहे मात्र दोघांमधील राजकीय शीतयुद्ध हे वारंवार पाहायला मिळतच आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेंचा पराभव झाला मात्र पक्षाकडून त्यांना राजकीय पाठबळ देत त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. शिंदे कर्जत जामखेडमध्ये विविध विकास कामांच्या माध्यमातून रोहित पवार यांना धक्का देत आहे. यातच आता कर्जत नगरपालिकेवर एक हाती सत्ता असलेल्या रोहित पवार यांच्या बालेकिल्ल्याला शिंदे यांनी सुरुंग लावला आहे.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सरकारला दणका, पोलिसांवर गुन्हा दाखल होणार

राष्ट्रवादीसह काँग्रेसचे नगरसेवक शिंदे यांना भेटून भाजपात जाणार असल्याचे समोर येत आहे. यामुळे कोठेतरी रोहित पवारांकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची सुरुवात व पवार यांना राजकीय धक्का देण्याचे काम राम शिंदे यांच्याकडन सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube