Jaykumar Gore : भ्रष्ट मंत्र्याला वाचवण्यासाठी सरकार अजून किती कुटाणे करणार? रोहित पवारांनी केला धक्कादायक खुलासा

Jaykumar Gore : भ्रष्ट मंत्र्याला वाचवण्यासाठी सरकार अजून किती कुटाणे करणार? रोहित पवारांनी केला धक्कादायक खुलासा

Rohit Pawar On Jaykumar Gore Case : मंत्री जयकुमार गोरे ब्लॅकमेल प्रकरणात (Jaykumar Gore Case) दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट येत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळ चांगलाच रंगला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी जाणीवपूर्वक कट रचून करण्यात आल्याचं म्हटलं. यामध्ये रोहित पवार, सुप्रिया सुळे यांचा देखील समावेश आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. तर आता रोहित पवारांनी (Rohit Pawar) यामध्ये धक्कादायक खुलासा केलाय. सोशल मिडिया पोस्ट करत त्यांनी म्हटलंय की, एका भ्रष्ट मंत्र्याला वाचवण्यासाठी यंत्रणा कशी घरगड्यासारखी राबते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रकरण.

पोस्टमध्ये रोहित पवार यांनी, हे प्रकरण समोर आणणारे पत्रकार तुषार खरात (Tushar Kharat) यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गुन्हे नोंदवायचे, अटक करायची, एका गुन्ह्यात जामीन मिळताच दुसऱ्या गुन्ह्यात अटक करायची, जेणेकरून पत्रकार एक दोन महिने आतच सडला पाहिजे. त्याचे मानसिक खच्चीकरण झाले पाहिजे, हा या सरकारचा कारभार आहे का? असा सवाल देखील केलाय.

शेअर बाजार गडगडला! एकाच दिवसांत गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी पाण्यात; काय घडलं?

पीडित महिलेच्या वकिलाला हाताशी धरून तिलाच खंडणीच्या गुन्ह्यात फसवायचे, एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळताच तिचे नाव दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून पोलीस कस्टडी घ्यायची, तिचा भावनिक आणि मानसिक छळ करायचा, ही सरकारची नवी कार्यपद्धती आहे का?

राजकीय नावे घेण्यासाठी आता तर पत्रकार आणि पीडित महिलेवर दबाव टाकला जात आहे. या दोघांना स्वतःच्या हस्ताक्षरात मंत्री सांगतील ती नावे लिहून देण्यासाठी मकोका लावण्याच्या धमक्या दिल्या जात आल्याची चर्चा आहे, ही आहे सरकारची कार्यपद्धती आणि नवा पॅटर्न असल्याचा आरोप देखील रोहित पवार यांनी केलाय.

किवींचा पराक्रम! फक्त 60 चेंडूतच जिंकला सामना, मालिकाही खिशात; पाकिस्तानचा पराभव..

विशेष म्हणजे तपास अधिकारी अरुण देवकर जो मंत्र्यांच्या अत्यंत जवळचा मित्र आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस विभागाने पीटा कायद्यात (अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा) गुन्हा दाखल करत अटकही केली होती. भ्रष्ट मंत्र्याला वाचवण्यासाठी सरकार अजून किती कुटाणे करणार? पोलिसांवर, यंत्रणेवर दबाव आणून काळे कारनामे लपवता येणार नाहीत. कितीही काथ्याकुट करा, आम्ही सत्य समोर आणूच, असं रोहित पवार यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube