जिल्ह्यात चार हजार कोटींच्या रस्त्यांची कामे; विखेंनी वाचला विकासकामांचा पाढा

अहमदनगर : आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल व जास्त निधी मतदारसंघासाठी कसा मिळेल यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतो. आपण योग्य सक्षम लोकप्रतिनिधी निवडून दिला तर तो सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आम्ही आपल्या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणून प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी केले. तसेच मोदींच्या नेतृत्वाखाली […]

Ahmednagar : सुजय विखेंसाठी नगरकरांचं ठरलंय; भाजप नेत्याच्या वक्तव्याने वेगळीच चर्चा...

Ahmednagar : सुजय विखेंसाठी नगरकरांचं ठरलंय; भाजप नेत्याच्या वक्तव्याने वेगळीच चर्चा...

अहमदनगर : आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल व जास्त निधी मतदारसंघासाठी कसा मिळेल यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतो. आपण योग्य सक्षम लोकप्रतिनिधी निवडून दिला तर तो सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आम्ही आपल्या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणून प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी केले. तसेच मोदींच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रस्त्यांची काम झाल्याचं विखे म्हणाले.

मनोज जरांगेंची तब्येत पुन्हा बिघडली; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं? 

श्रीगोंदा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी खासदार विखे बोलत होते. यावेळी बोलताना विखे म्हणाले, आमदार बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून कोळगाव मध्ये 33 कोटी रुपयांची विकास कामे होत आहेत. आपण विकासाला प्राधान्य द्याल तर आपल्या मुलांचे उज्वल भविष्य घडेल.

Devendra Fadnavis : सरकार सकारात्मक, जरांगेंनी उपोषणाचा निर्णय..; फडणवीसांनी केलं आवाहन 

ते म्हणाले, नगर जिल्हा विकासाच्या बाबतीत दहा वर्ष मागे होता. पण, राज्यातील गतिमान सरकारमुळं जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नगर जिल्हा विकास कामाच्या बाबतीत पाच वर्ष पुढे नेऊन ठेवला आहे. मोदींच्या संकल्पेनतून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रस्त्यांचे काम आज नगर जिल्ह्यात झाले असल्याचे मत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

साकळाई योजने संदर्भात अनेक वर्ष राजकारण झालं. अनेकांची भाषणे झाली. मात्र आमदार पाचपुते, कर्डिले व माझ्या माध्यमातून साकळाई योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. तसेच 794 कोटी रुपयांची येत्या जानेवारी महिन्यात प्रशासकीय मान्यता घेऊन लवकरच तेही काम पूर्ण होईल, अशी ग्वाही यावेळी ग्रामस्थांना दिली.

यावेळी बोलताना विक्रमसिंह पाचपुते म्हणाले, गावच्या विकासामध्ये भर पाडायची असेल तर रस्ते झाले पाहिजे. रस्ते झाल्याने दळणवळण वाढते व गावच्या विकासाला प्रारंभ होतो. येत्या तीन ते चार महिन्यात श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यांचे स्वरूप बदलून जाईल व विकास होत असताना गावकऱ्यांचा हातभार लागल्याने विकासामध्ये अधिक भर पडते, असं पाचपुते म्हणाले.

Exit mobile version