Download App

एकनाथ खडसे… काय तुझी ही व्यथा…! लोढासोबत फोटो पोस्ट करत महाजनांचा पलटवार

Girish Mahajan यांचे हनीट्रॅपचे कनेक्शन असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावर महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला आहे.

Girish Mahajan Criticize Eknath Khadase on photo with Praful Lodha : जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे प्रफुल्ल लोढा यांना पोक्सो अंतर्गत अटक झाली आहे. त्यानंतर त्यांचे मंत्री गिरीश महाजनांशी (Girish Mahajan) संबंध असून महाजनांची देखील चौकशी केली जावी. तसेच यामध्ये हनीट्रॅपचे देखील कनेक्शन असल्याचा आरोप शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केले होते. त्यानंतर आता गिरीश महाजन यांनी आता एकनाथ खडसेंचाच प्रफुल लोढासोबतचा फोटो पोस्ट करत पलटवार केला आहे.

जयंत पाटलांचा इशारा खरा ठरला! हर्षल पाटलांच्या आत्महत्येनंतर जुना VIDEO होतोय व्हायरल…

काय म्हणाले गिरीश महाजन?

मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, एकनाथ खडसे, तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय.हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात ? हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे. 2019 ते 2022 च्या दरम्यान अश्या खोट्या पुराव्यांचा आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच. आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय ? एकनाथ खडसे… काय तुझी हि व्यथा…! असा टोला महाजनांनी लगावला आहे.

खळबळजनक! हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं दिवसाढवळ्या अपहरण, बेदम मारहाण करत पुलावरून फेकून दिलं

नेमकं काय म्हणाले होते एकनाथ खडसे?

प्रफुल्ल लोढा हा अगोदर एक सामान्य कार्यकर्ता होता. नंतर त्याचे गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि इतर राजकारण्यांशी संबंध आले. त्यातून तो 50-60 कोटींचा मालक झाला आहे. मात्र बराच काळ एकत्र राहिल्यानंतर महाजन आणि लोढामध्ये दुरावा आला. तेव्हा लोढांनी महाजनांना खालच्या भाषेत टीका करत होते. त्यावेळी लोढा यांचे व्हिडीओ समोर आले होते. त्यात ते म्हणाले की, मला ब्लॅकमेल करू नका नाही. तर मी पोलिसांमध्ये तक्रार दाखल कलेली आहेच पण जर मी एक बटण दाबलं तर सगळं समोर येईल. तसेच ट्रायडंट हॉटेलला तुम्ही माझे कसे पाय चाटत होते हे मी सगळ्या जगाला सांगेल. त्यानंतर लोढाला भाजपमध्ये प्रवेश दिला गेला. त्यामुळे जर लोढा आणि महाजन यांच्यामध्ये आता एवढी जवळीक कशी काय निर्माण झाली. त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी काय आली? हे सर्व पैसे लोढाला ब्लॅकमेलिंगमधून मिळाले का? याची चौकशी व्हायल हवी.

बनावट सह्यांवर 31 जणांना सरकारी नोकरी! छ. संभाजीनगरमधील घोटाळ्याने खळबळ

आता त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात एक गुन्हा पोक्सो अंतर्गत आहे. तसेच त्याला अटक झाली आहे. अशा माणसाला भाजपमध्ये घेणे तेही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे कितपत योग्य आहे. त्यामुळे हनी ट्रॅपिंगचं जे प्रकरणं समोर आलं आहे. ते अधिकाऱ्यांचं नसून ते राजकारण्यांचं आहे. असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे.

follow us