Girish Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. त्यांची हीच टीका महाजनांना चांगलीच झोंबली. त्यांनीही खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांना 137 कोटी रुपयांची नोटीस आल्याने हृदयविकाराचा झटका आल्याचे सोंग केल्याचा आरोप महाजन यांनी केला.
मंत्री महाजन यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना खडसे यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले. एकनाथ खडसेंना स्वतःच्या तब्बेतीची काळजी घेण्यास सांगा. सर्व प्रश्न आपोआप सुटतील. 137 कोटींची नोटीस आल्यानंतर सोंग करायचे. काही झाले नसताना दवाखान्यात जाऊन बसायचे. केवळ नोटीस आल्यामुळे त्यांनी कोर्टाची सहानुभूती मिळवण्यासाठी आजारपणाचे नाटक केले. त्यांना असा कोणता हृदयविकाराचा झटका आला. खोटी सोगं करायची, उपचार घ्यायचे आणि परत इकडे येऊन आरोप करायचे याला काय म्हणावे, असा सवाल महाजन यांनी केला.
काही दिवासांपूर्वी एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत एअर अॅम्ब्यूलन्सची व्यवस्था करून दिली होती. या अॅम्ब्यूलन्सच्या मदतीने खडसेंना मुंबईत आणण्यात येऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथील उपचारानंतर खडसे आता या आजारातून बरे झाले आहेत.
Eknath Khadse : मराठा समाजाला दिलेला शब्द पाळा.. खडसेंनी फडणवीसांना घेरलं
काय म्हणाले होते खडसे ?
मराठा समाजाला आज निर्णय घेतो, उद्या निर्णय घेतो असे आश्वासन त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास आपण राजकारण सोडू असा शब्द फडणवीस यांनी दिला होता. आता हा शब्द त्यांनी पाळावा. आता समाजाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. तेव्हा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी. संकटमोचक गिरीश महाजन यांनी मार्ग काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावे.
दरम्यान, राज्य सरकारने 24 डिसेंबरच्या आता मराठा आरक्षण जाहीर करावे अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. एक डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण सुरू करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
Girish Mahajan : ‘संजय राऊतांच्या डोक्याचा इलाज करा’; ‘त्या’ वक्तव्यावर महाजनांचा खोचक टोला