जळगाव : मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे जेष्ठनेते एकनाथ खडसे यांच्यातील वाक युद्ध संपेना काही दिवसापूर्वी एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर टीका करताना म्हंटले होते की महाजन यांना राज्याचे मुख्यमंत्री व्हायचं होत परंतु त्यांचं ते स्वप्न अधुरेच राहिले.
या टीकेला महाजन यांनी अनेकदा प्रत्युत्तर दिले. त्यात आज पुन्हा पत्रकारांनी त्यांना त्यावर प्रश्न विचारला त्यावर महाजन म्हणाले… खडसे साहेबांना देखील भाजपमध्ये असताना मुख्यमंत्री व्हायचं होत ते तर देव पाण्यात घालून बसले होते. आणि माझं विचारतं तर मला मुख्यमंत्री कधीच व्हायचं नव्हतं आणि व्हायचं पण नाही.
तसेच महाजन पुढे म्हणाले त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद परंतु नाथाभाऊ मंत्री असताना त्यांनी काय – काय कारनामे केले हे सर्वानाच माहित आहे. त्यामुळेच त्यांची चौकशी चालू आहे. आणि त्यांचे जावई देखील गेले दोन वर्ष झाले आतमध्ये आहेत. त्यांना म्हणा अगोदर आपल्या जावयाला बाहेर काढा मग माझ्या वर टीका करा.
Chandrakant Patil आजारी शरद पवारांना फिरवता… हे अमानवी नाही का ?
तसेच खडसे वाहिनींची देखील चौकशी सुरु यामधून त्या निर्दोष बाहेर याव्यात एवढीच आमची इच्छा आहे. असा खोचक टोला महाजनांनी लगावला. शेवटी पत्रकारांनी विचारले एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार आहे? यावर महाजन म्हणाले मला काही माहित नाही जर त्यांना भाजपमध्ये यायचे असेल तर त्यांच्यासाठी भाजपचे दरवाजे नेहमी उघडे आहेत.