Chandrakant Patil आजारी शरद पवारांना फिरवता… हे अमानवी नाही का ?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या आजारपणाबाबत एक विधान केले. मात्र, त्यांची मेमरी कमी आहे. त्यांना हे माहिता नाही की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आजारी असूनही त्यांना आता कसब्यात यावं लागतंय. मग आजारी असताना त्यांना फिरवता हे अमानवी नाही का ? आम्हाला आमच्या नेत्यांचा अभिमान आहे. स्व. आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak), लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि खसदार गिरीश बापट हे आजारी असतानाही ऑक्सिजन सिलेंडर घेऊन प्रचाराला आले. कारण माध्यमामध्ये चुकीचं चालवलं गेलं. आम्हाला बापट यांचा अभिमान आहे, असे म्हणत भाजपचे नेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना लगावला.
स्व. मुक्ताताई टिळक व स्व. लक्ष्मण जगताप हे अत्यंत गंभीर अजाराशी झुंजत असतानाही फणवीसांनी त्यांची दमछाक केली. आता आदरणीय खा. बापट साहेब गंभीर आजारी असताना त्यांना एका पोटनिवडणुकीसाठी प्रचार करायला भाग पाडलं जातंय. राजकारणासाठी माणुसकी विसरणारा नेता म्हणून फडणवीस कायम ओळखले जातील. pic.twitter.com/ExZxzSBHD4
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 16, 2023
चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्रशांत जगताप यांनी आधी शरद पवार यांनाही हा सल्ला द्यावा की तुम्ही किती परिश्रम घेत आहात. आता जरा आराम करा. तसेच तुमच्यावर आणि तुमच्या वरच्या नेत्यांवर पणं विश्वास नाही का म्हणून कोणावर विश्वास न ठेवता तुम्ही फिरत आहेत.
गिरीश बापट आठवड्यातून तीन वेळा रुग्णालयात जातात. संजय काकडे यांच्या बोलण्याचा तुम्ही माध्यमांनी वेगळा अर्थ लावला. त्यांच्या भाषेत ते बोलले असतील. गिरीश बापट यांना आवाहन करण्याची गरज नसते, स्वतः हुन बाहेर पडतात.
तीन आठवड्यात किमान २१ वेळा मी त्यांना स्वतः जाऊन भेटलो आहे. आजारी असतानाही निवडणूक कशी जिंकता येईल हे ते पाहत आहेत, असे देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.