Gulabrao patil On Sanjay Raut : उद्धव ठाकरे यांची उद्या जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यामध्ये सभा आयोजित कारणात आली आहे. या सभेच्या नियोजनासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आजच पाचोऱ्यात दाखल झाले. नेहमी प्रमाणे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांनी एकमेकांवर टीका करायला सुरुवात केली आहे. जळगावमध्ये आल्यानंतर संजय राऊत यांनी गुलाबरावांना उद्देशून जळगावमध्ये घुसलो असे म्हंटले. त्यावर गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना इशारा दिला.
गुलाबराव पाटील म्हणाले ज्यांनी शिवसेनेची वाट लावली त्यांना आमचा विरोध आहे. ते म्हणाले मी जळगावात पाय ठेवला. रेल्वे स्टेशनवर दिसलं ना काय झालं, संजय राऊतांना दिसलं तिथे काय झालं ते, एकही कार्यकर्ता येऊ देणार नाही आणि आले तर जाऊ देणार नाही असं बोलत होते. अहो रेल्वे स्थानकावर कार्यकर्ते येऊन गेले. ते आले आणि वापस गेलेही. आम्हाला या आयडिया शिकवू नये. राऊत कोणत्याच आंदोलनात नव्हते. शिवसेनेचं आंदोलन कसं करावं हे त्यांना माहिती नाही. आम्ही दगडं मारुन लोकांच्या सभा बंद करणारे लोकं आहोत. त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करु नये”, असा मोठा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.
बॅनरवर शिंदे-फडणवीसांचे फोटो नसल्यानं ठाकरे गट आणि भाजप यांच्यात शाब्दिक वाद
“उद्धव ठाकरे यांच्या सभेला कुणीही विरोध केलेला नाही. आर ओ तात्यांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला कुणीही विरोध केलेला नाही. आर ओ तात्या आमचे जीवलग मित्र होते. ते आमच्या प्रत्येक सुख-दु:खात येणारे होते. त्यांच्या पुतळाच्या कार्यक्रमादरम्यान संजय राऊत नेहमी वेगळं वक्तव्य करत आहेत. आमचा त्यांना विरोध आहे. ते आजही गुलाबी गँग बोलले. त्यांना सगळं बोलायची मुभा आहे का?”, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.