Kaka Koyate On Radhakrishna Vikhe: कोपरगाव (Kopergaon) नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) व भाजपच्या कोल्हे गटामध्ये संघर्ष दिसून येत आहे. महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काका कोयटे (Kaka Koyate) हे राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. ते एेनवेळी राष्ट्रवादीत गेले आहे. ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे ( Radhakrishna Vikhe) यांच्या जवळचे आहेत. त्यांनीच कोयटे यांना राष्ट्रवादीत पाठविले असल्याची राजकीय चर्चा आहे. त्यावर काका कोयटे यांनी थेटपणे उत्तर दिले आहे.
विरोधकांनी कोपरगावच्या विकास कामांना स्थगिती दिली होती, काकासाहेब कोयटे यांना लोकांचा पाठिंबा
कोयटे म्हणाले, माझ्या राष्ट्रवादी प्रवेशामागे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची कोणतेही भूमिका नाही. पण ते माझे मित्र आहेत. युवक काँग्रेसमध्ये आम्ही दोघांनी काम केले आहे. आमदार आशुतोष काळे हे मला अजितदादांकडे घेऊन गेले होते. अजितदादांनी कोपरगावच्या विकासासाठी निधी देण्याचा आश्वासन दिले आहे, त्यामुळे मी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मी नगराध्यक्ष झाल्यानंतर निधी मागण्यासाठी मी पालकमंत्र्यांकडे जाईल. गेल्या वर्षी माझ्या प्रभागामध्ये अडीच कोटींचा निधी विखे यांनी दिला होता. शहराच्या विकासासाठी ते निधी देतील. पण माझ्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामागे विखे यांचा कोणताही सहभाग नाही. (Kaka Koyate On Radhakrishna Vikhe kopergaon nagarpalika)
…तर त्यांच्यासारखा नीच माणूस पृथ्वीतलावर नसेल; जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंवर थेट वार
मराठा व ओबीसी वाद सुरू आहे. कोयटे हे ओबीसी उमेदवार आहेत. त्यावर ते म्हणाले, मी जातीयवाद्याच्या भानगडीत पडणार नाही. मला ओबीसी चेहराएेेवजी कोपरगाव विकासाचा चेहरा व्हायचे आहे. ओबीसी म्हणून मला उमेदवारी दिलेली नाही. विकासाच्या व्हिजनमुळे मला उमेदवारी मिळाली आहे.
आका माहित नाही पण मी सर्वांचा काका
आका, काका अशी टीका केली जात आहे. त्यावर ते म्हणाले, राजकारणात आका कोण आहेत हे मला माहिती नाही. परंतु मी कोपरगावचा लाडका काका आहे. हा काका कोपरगावसाठी आयुष्य समर्पित करत आहे.
कोल्हे गटाचा योजनांना विरोध
गट-तटाच्या राजकारणाचा फटका कोपरगावच्या विकासाला बसला आहे. आमदार आशुतोष काळेंनी अनेक योजना कोपरगावसाठी आणल्या आहेत. कोल्हे गट योजनांच्या विरोधात जातात. कधीही न्यायालयात जायचे. कधी जनतेमध्ये अपप्रचार केला जात आहे. राजकारणामुळे कोपरगावच्या विकासाला फटका बसत आहे. मी काम अशा पद्धतीने करणार आहे की विरोधकांना नामोहरम करणार आहे, असे कोयटे म्हणाले.
