Download App

काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कारांचे रविवारी वितरण, जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शहा यांचा सन्मान होणार

यंदा आरोग्य भूषण या पुरस्काराने जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शहा ( Vinod Shah) यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

  • Written By: Last Updated:

Kakasaheb Mhaske Memorial Awards to Founder of Janaseva Foundation Dr. Vinod Shah :
काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कारांचे वितरण येत्या रविवारी होणार आहे. काकासाहेब म्हस्के यांच्या ४४ व्या पुण्यतिथीच्या दिवशी हा कार्यक्रम होत असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ.सुभाष म्हस्के यांनी दिली.

यंदा आरोग्य भूषण या पुरस्काराने जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शहा यांचा सन्मान करण्यात येणार आहे. डॉ.शहा यांनी जेष्ठ नागरिकांसाठी केलेले कार्य राष्ट्रीय पातळीवर गौरविले गेले असून आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लखनऊ विद्यापीठ तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे उपस्थित राहणार असल्याचे असल्याची माहिती डॉ. सुभाष म्हस्के यांनी दिली.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त डॉ.सुमति म्हस्के, विश्वस्त डॉ.अभितेज म्हस्के, विश्वस्त डॉ. दिप्ती ठाकरे, संस्थेचे सीईओ आर्किटेक्ट समीर ठाकरे, काकासाहेब म्हस्के काॅलेजच्या प्राचार्या डॉ.निलिमा भोज, काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नितीन ठुबे, पार्वतीबाई नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजित चवरदार आदींनी केले आहे. काकासाहेब म्हस्के यांच्या पुतळ्याचे संस्था आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात येणार असल्याचे डॉ.सुभाष म्हस्के म्हणाले. काकांची नाळ आयुष्यभर सर्वसामान्य, गोरगरिबांशी जुळलेली होती. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जपण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटर सिस्टीम सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा वंध्यत्व या विषयावर डॉ. विनोद शहा यांच्यासह जागतिक आरोग्य संघटनेसोबत कार्याचा ठसा उमटवलेले डॉ. सुभाष साळुंखे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

follow us

संबंधित बातम्या