कर्मवीर कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितपणे सकारात्मक परिवर्तन घडेल असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे. (Farm) या मोहत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सार्थकी लावलं. त्यांच्या विचारांच्या वाटेवर वाटचाल करत आहोत असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
त्याचबरोबर अस्मानी संकटामुळे बेभरवशाचा झालेला शेती व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होवून त्यांची आर्थिक भरभराट व्हावी या उद्देशातूनच तीन दिवसीय ‘कर्मवीर कृषी महोत्सवाच आयोजन होत आहे. यावर्षी २०२५’चे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दतात्रय भरणे यांच्या हस्ते व अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले होते. या कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ ला अहिल्यानगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजी नगर व नासिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी भेट देवून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाला शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी अधिकची उर्जा मिळाली आहे. असंख्य शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवाला भेट देवून आधुनिक शेतीचे ज्ञानधन आणि तंत्रज्ञानाची संपदा अवगत केली.
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे व न परवडणारा शेती व्यवसाय नफ्यात कसा येईल यासाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान,आधुनिक शेती पद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी गौतम पब्लिक स्कूलच्या विस्तीर्ण मैदानावर तीन दिवस पार पडलेल्या कर्मवीर कृषी महोत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. आ. आशुतोष काळे यांनी कर्मवीर कृषी महोत्सवातील प्रत्येक स्टॉल्सला भेट देवून त्यांचे उत्पादन व त्यामुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होवून शकतो याबबत माहिती जाणून घेतली व कृषी महोत्सवाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला.
यावेळी या प्रदर्शनात सहभागी झालेल्या शेती बी-बियाणे, खते उत्पादन करणाऱ्या कंपन्या, शेती औजारे निर्माण करणाऱ्या कंपन्या व असंख्य शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करून आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयोजित कर्मवीर कृषी महोत्सवात विविध आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके, कृषी क्षेत्रातील नवकल्पना, शाश्वत शेतीसाठी उपयुक्त मार्गदर्शन सत्रे तसेच शेतकरी-उद्योग संवाद या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान, ज्ञान आणि प्रयोगशीलतेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाला प्रगत करण्याचे कामगिरी या कर्मवीर कृषी महोत्सवातून साध्य होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजी नगर व नासिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला भेट दिली.या महोत्सवात कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळ व संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान शिबिरात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून निदान झालेल्या आजारावर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य तसेच कारखान्याचे व्हा.चेअरमन, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक,जनरल मॅनेजर, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर,सेक्रेटरी,असी.सेक्रेटरी, ऊस विकास विभाग, तसेच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलं. प्रत्येक वर्षी या मोहत्वाची मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते आहे राज्यभरातून सर्वच ठिकाणाहून लोक या मोहत्सवासाठी येत असतात. यामधून शेती करणाऱ्या किंवा करू पाहणाऱ्या अनेक लोकांना महत्वाची माहिती मिळते.
