कोपरगाव: सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यात सर्वाधिक दर देणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर (Shankarao Kale Shakhar Kharkhana) कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (दि. ८) रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी दिली आहे.
जोरदार शक्तिप्रदर्शन करत आशुतोष काळेंचा उमेदवारी अर्ज; रॅलीत आवतरला जनसागर
कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर तसेच कारखान्याचे जेष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीची शिखरे गाठत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गळीत हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. कारखान्याचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात येणार आहे.
Ahmednagar Assembly Election: आघाडीतील बंड शमले ! शशिकांत गाडे यांचा अभिषेक कळमकरांना पाठिंबा
७० व्या गळीत हंगामाच्या सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद वर्ग व उद्योग समूहावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतक, कार्यकर्त्यांनी गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ व कारखाना व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.