दुधाळ जनावरे मोजकीच पाळा आणि त्यांची योग्य काळजी घ्या; पशुसंवर्धन तज्ज्ञ डॉ.शैलेश मदने

Dr. Shailesh Madane: योग्य नियोजन न झाल्यामुळे कालांतराने जास्त गायींची संख्या असलेले गोठे बंद पडले असल्याचे मदने यांनी म्हटलंय.

Keep a small number of dairy animals and take proper care of them; Animal husbandry expert Dr. Shailesh Madane

Keep a small number of dairy animals and take proper care of them; Animal husbandry expert Dr. Shailesh Madane

कोपरगाव: दूध उत्पादनात नफा मिळवण्यासाठी फक्त अधिक उत्पादन नव्हे तर किफायतशीर उत्पादन महत्त्वाचे आहे. जनावरांचे आरोग्य, संतुलित पोषण, स्थानिक खाद्य-साधनांचा वापर, वेळेवर प्रजनन व्यवस्थापन आणि आजार नियंत्रण या बाबींकडे विशेष लक्ष दिल्यास निश्चितपणे खर्च कमी होऊन दूध उत्पादन वाढवता येते. दुधाळ जनावरांची संख्या जास्त म्हणजे दूध उत्पादन जास्त असे मुळीच नाही. गायांची संख्या मर्यादित आहे तो पर्यंत तो गोठा व्यवस्थित चालतो परंतु गायांची संख्या अतिरिक्त झाल्यास त्या गायांना पौष्टिक चारा न मिळाल्यामुळे व योग्य नियोजन न झाल्यामुळे कालांतराने अशा जास्त गायींची संख्या असलेले गोठे बंद पडले आहेत. जर जास्त दुध उत्पादन घ्यायचे असेल तर दुधाळ जनावरे मोजकीच पाळा आणि त्यांची योग्य काळजी घ्या तरच दुग्ध व्यवसाय फायदेशीर राहील असा महत्वपूर्ण सल्ला प्रसिद्ध पशु संवर्धन तज्ञ डॉ.शैलेश मदने यांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिला. (Keep a small number of dairy animals and take proper care of them; Animal husbandry expert Dr. Shailesh Madane)

शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले असले तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय कसा फायदेशीर राहू शकतो. त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे. याबाबत माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे (Karmaveer Shankaraoji Kale) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२५’ (‘Karmaveer Krishi Mahotsav 2025)


हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक फेल बैलजोडीने शर्यत जिंकली; वाचा काय आहे खुराक ?

मध्ये डॉ.शैलेश मदने (बारामती) यांचे ‘किफायतशीर दुग्ध व्यवस्थापन’ ह्या विषयावर चर्चा सत्र पार पडले. याप्रसंगी दूध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी आ.आशुतोष काळे, कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रवीण शिंदे, संचालक राजेंद्र घुमरे, श्रीराम राजेभोसले, सुनील मांजरे, सूर्यभान कोळपे, सचिन चांदगुडे, राहुल रोहमारे, वसंतराव आभाळे, प्रशांत घुले, शंकरराव चव्हाण, विष्णू शिंदे, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मदने म्हणाले, जनावरे असे तयार करा ज्यांची ठेवण अशी असेल की ते कधी आजारी पडणार नाही. दुधाचा धंदा दुकान समजून करा आणि नफा तोटा याचा हिशोब ठेवा. गायींना लस कधी द्यायची, जंताचे औषध कधी द्यायचे, वजन कधी करायचे, बचत कशी झाली पाहिजे. आपल्याकडे चारा किती आहे, किती गायी आणि कालवडीचा योग्य पद्धतीने सांभाळ करू शकतो आणि कमी कष्टात जास्तीत जास्त नफा कसा कमवू शकतो हे अगोदर निश्चित करा.दुग्ध व्यवसाय करतांना आहार व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असून दुधाला दर कमी असो वा जास्त गायींना चांगले खायला घालणे, पैदाशीची वही, जमा खर्चाची वही आणि कोणत्या आजारांसाठी कोणती औषधे वापरतात त्याची माहिती ठेवण्यासाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या नोंदी ठेवणे गरजेचे आहे. दुग्ध व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, योग्य जातीच्या जनावरांची निवड करून, उत्तम आहार व्यवस्थापन, स्वच्छ आणि आदर्श गोठा आणि जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शेतीसोबत हा व्यवसाय सुरू केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकते असा विश्वास उपस्थित दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला व त्याच्या शंका निरसन करून डॉ.मदने यांनी प्रत्येक प्रश्नाला सविस्तर उत्तरे दिली. प्रत्यक्ष उदाहरणे देऊन किफायतशीर दूध उत्पादनाच्या यशस्वी मॉडेल्सची माहिती दिली.

नरभक्षक बिबट्याला ठार मारा; घटनास्थळावरून आमदार आशुतोष काळेंची उपमुख्यमंत्री अजितदादांकडे मागणी

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. राज्यात सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने प्रगत साखर कारखाने म्हणून ओळखले जातात. ज्याप्रमाणे त्या साखर कारखान्यात सहकारपद्धतीने काम चालते आणि त्या ठिकाणी समृद्धी दिसून येते. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देतोच परंतु या कारखान्याच्या परिसरात आल्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रगत साखर कारखान्याच्या परीसरात आल्यासारखे वाटते यावरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रगती दिसून येते, असे डॉ.शैलेश मदने यांनी म्हटलंय.

Exit mobile version