हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक फेल बैलजोडीने शर्यत जिंकली; वाचा काय आहे खुराक ?
सांगलीत पार पडलेल्या या शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते मंडळी आणि बैलगाडा शर्यतप्रेमी उपस्थित होते.
सांगलीतील बोरगावमध्ये बैलगाडा शर्यत पार पडली. (Patil) डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलं होतं. या शर्यतीत शेकडो बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, हेलिकॉप्टर बैज्या व ब्रेक फेल या बैलजोडीने मानाची फॉर्च्युनर पटकावली आहे. आज आपण हेलिकॉप्टर बैज्याचा खुराक काय आहे? तो शेतात काम करतो का? त्याच्या नावामागे नेमकी काय कहाणी आहे असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
सांगलीत पार पडलेल्या या शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते मंडळी आणि बैलगाडा शर्यतप्रेमी उपस्थित होते. शर्यतीच्या मैदानाला जत्रेचे स्वरूप आले होते. कोल्हापूरच्या शिरोळचे बाळू दादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैज्या आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेक फेल बैलजोडीने फॉर्च्युनर गाडी जिंकली आहे. तसंच, इतर बैलजोड्यांनाही थार आणि इतर बक्षीस देण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा एकला चलो नारा, वडेट्टीवांरांची मोठी घोषणा
बाळू दादा हजारे यांच्या हेलिकॉप्टर बैज्याने आतापर्यंत बरीच मैदाने मारली आहेत. गेल्या चार वर्षांत त्याने दीडशेपेक्षा जास्त शर्यतींमध्ये भाग घेतला आहे, यातील बऱ्याच शर्यती त्याने जिंकल्या आहेत. या ट्रॅक्टर, थार, रोख रक्कम, गदा आणि इतर बक्षिसांचा समावेश आहे. त्यामुळे शर्यतीच्या मैदानात या बैलजोडीची नेहमीच चर्चा असते.
शर्यतीच्या बैलांना शेतकामासाठी वापरले जात नाही, त्याला दोन देवसातून एकदा अर्ध्या तासासाठी औताला जुंपले जाते. बैज्याच्या आहाराबाबत बोलताना बाळू हजारे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, बैज्याचा खुराक सामान्य आहे, त्याला चारा आणि इतर जनावरे खातात तेच खाद्य दिले जाते. शर्यतीत धावणाऱ्या अनेक बैलांना दूध पाजले जाते, मात्र बैज्याला दूध पाजले जात नाही असंही हजारे यांनी सांगितले.
हेलिकॉप्टर बैज्या हा आपल्या वेगासाठी ओळखला जातो, बैज्या तुफान पळतो, हेलिकॉप्टरसारखा जातो म्हणून पोरांनी त्याला हेलिकॉप्टर बैज्या म्हणायला सुरूवात केली, त्यामुळे बैज्याला हेलिकॉप्टर बैज्या असं नाव पडलं अशी माहितीही हजारे यांनी दिली आहे. या बैज्यामुळे आता हजारे यांचं नाव राज्यभर गाजत आहे. काही दिवसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस दिले जाणार आहे.
