Download App

कोपरगाव मतदारसंघातील एक कोटींच्या विकासकामांना मंजुरी : आ. आशुतोष काळे

कोपरगाव मतदारसंघातील आमदार निधीतून होणाऱ्या १ कोटी रुपये निधीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Kopargaon News : कोपरगाव मतदारसंघातील जनतेने सेवा करण्याच्या दिलेल्या संधीतून मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्यासाठी शासन दरबारी अविरतपणे केलेल्या पाठपुराव्यातून मतदारसंघाच्या विकासाला आकार दिला आहे. विकासकामांना प्रशासकीय मंजुरी व निधीची तरतूद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. त्या प्रयत्नातून मतदारसंघातील आमदार निधीतून होणाऱ्या १ कोटी रुपये निधीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

यामध्ये कोपरगाव मतदारसंघातील जेऊर पाटोदा येथील चंद्रलीला कमान ते श्रीकृष्ण नगर पाटी धारणगाव रोड पर्यंत भूमिगत गटार करणे (१० लाख), शहाजापूर येथील भरत ढोंमसे घर ते गणपती मंदिर देशमुख वस्ती रस्ता करणे (१० लाख), कुंभारी येथे कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), दहेगांव बोलका येथील गधड रस्ता करणे (१० लाख), देर्डे चांदवड येथे संरक्षक भिंत बांधणे व सुशोभिकरण करणे (१० लाख), धारणगाव येथील इजिमा २१६ ते रघुनाथ जाधव घर ६ चारी रस्ता करणे (१५ लाख), नाटेगांव ते आंचलगांव रस्त्यावरील मोरे वस्ती जवळ नळ्या टाकून रस्ता करणे (१० लाख), येसगांव येथील ८ चारी येथील जुना रस्ता गणपती मंदिर ते दत्त मंदिर रस्ता करणे (१० लाख), तळेगाव मळे येथे आदिवासी वस्तीत सभामंडप बांधणे (१० लाख), मढी बु. येथील रा.मा. ७ ते चारी नंबर ७ गवळी वस्ती ग्रामा ३० पर्यंत रस्ता करणे (५ लाख) या विकासकामांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांना दिलासा, पिक विम्याचे 44.42 कोटी बँक खात्यात जमा, आमदार आशुतोष काळेंच्या प्रयत्नांना यश

मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याची संधी मिळाली. या संधीचा मतदारसंघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेतांना कोपरगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला आकार दिला. जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी अनेक रस्त्यांचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल करून सातत्याने पाठपुरावा करून मतदारसंघाच्या रस्ते व पुलांसाठी जवळपास ७०० कोटी निधी मिळविला. त्यामुळे निश्चितपणे रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यात यशस्वी झालो.

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना यामध्ये रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी मुलभूत प्रश्न मार्गी लावले आहेत. लवकरच या विकासकामांच्या निविदा प्रकिया पूर्ण होऊन कामे सुरू होतील. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्तत्ता होणार आहे. त्याबद्दल नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

मंजूर बंधारा काळे कारखान्याकडे हस्तांतरित केला असता तर शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते; आमदार आशुतोष काळे

 

follow us