कोल्हेंनी अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण हाणून पाडलं; मातंग समाजाचा आरोप, निषेध केला व्यक्त

कोपरगाव मतदारसंघात कोल्हे कुटुंबियांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण हाणून पाडलं, असा आरोप करत मातंग समाजाने काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केलायं.

Aashutosh Kale

Aashutosh Kale

Mla Aashutosh Kale : कोपरगाव मतदारसंघात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau sathe statue) यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा कोल्हे कुटुंबियांना होऊ दिला नाही, असा आरोप करत मातंग समाज बांधवांकडून काळ्याफिती लावून निषेध नोंदवण्यात आलायं. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा शासकीय अनावरण सोहळा आमदार आशुतोष काळे (Mla Aashutosh Kale) यांच्या पुढाकारातून पार पडणार होता. मात्र, कोल्हे कुटुंबियांनी होऊ न दिल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. अण्णाभाऊंच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा हाणून पाडणाऱ्यांना मातंग समाज जागा दाखवून देणार असल्याचा इशारा यावेळी मातंग समाजबांधवांकडून कोल्हे कुटुंबियांना देण्यात आलायं.

Stree 2 : थिएटरला पछाडल्यानंतर आता ओटीटीवर येणार श्रद्धाचा ‘स्त्री 2’, कधी रिलीज होणार?

मातंग समाजाकडून निषेध योग्यच – आमदार काळे

समाजातील काही व्यक्तींना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार महत्त्वाचे नसून त्यांना विरोधकांचे विचार महत्त्वाचे वाटतात. त्यांचाच विचार घेऊन त्यांनी या अनावरण सोहळ्याला विरोध केला व सोहळा पार पाडू नये यासाठी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांना फोन केले. याचा समाजाच्या माध्यमातून निषेध करणे योग्यच असल्याचं आमदार काळे यांनी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन सांगितलं.

यावेळी बोलताना सोमनाथ आहिरे म्हणाले, मागील अनेक वर्षापासून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा शासकीय अनावरण सोहळा काही चुकीच्या वृत्तींमुळे व त्यांना सहकार्य करणाऱ्या समाज द्रोह्यांमुळे रखडला होता. परंतु आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतल्याने अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय पद्धतीने होणार होता. त्यामुळे सर्व मातंग समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र, मातंग समाजाचा हा आनंद कोल्हेंना सहन न झाल्यामुळे त्यांनी नेहमीप्रमाणे काही मातंग समाज द्रोह्यांच्या मदतीने पुन्हा एकदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा शासकीय अनावरण सोहळा होवू दिला नसल्याचा आरोप आहिरे यांनी केलायं.

“धन्यवाद, तुम्ही माझा विचार केलात”, रतन टाटांच्या अखेरच्या सोशल मिडिया पोस्टची चर्चा…

तसेच अनावरण सोहळा होऊ नये म्हणून कोल्हे कुटुंबियांनी सचिन साठे यांना एवढी चुकीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कार्यक्रमाला येण्यास नकार दिला असल्याचं आहिरे यांनी सांगितलंय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे आमचे दैवत आहे. त्यामुळे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा शासकीय अनावरण सोहळ्यासाठी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांना येण्यापासून रोखणाऱ्या मातंग समाज विरोधी कोल्हे कुटुंबाचा व त्यांना सामील असलेल्या समाजद्रोह्यांचा काळ्या फिती लावून निषेध जाहीर निषेध करीत असल्याचे सोमनाथ आहिरे यांनी सांगितले.

यावेळी दिलीप तूपसैंदर, नितीन साबळे, बाळासाहेब पवार, राजेंद्र खैरनार, प्रवीण शेलार, सोमनाथ आहिरे, संपत चंदनशिव, दीपक आरणे, रमेश सोळसे, किरण आढागळे, सुनील वैरागर, संजय साळवे, एकनाथ राक्षे, तेजस साबळे आदी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले.

कोल्हे कुटुंबाच्या दबावामुळे सोहळा हाणून पाडला – नितीन साबळे

कोल्हे कुटुंबाच्या दबावामुळे आमच्या समाजातील काही अपप्रवृत्तीच्या लोकांच्या मदतीने पुन्हा एकदा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा शासकीय अनावरण लोकार्पण सोहळा हाणून पाडला. मातंग समाजातील काही लोकांना कोल्हे कुटुंबाने अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांना फोन करायला लावले. तुम्ही जर कोपरगावात प्रवेश केला तर,आम्ही तुमचा जाहीर निषेध करू, तुम्हाला काळे झेंडे दाखवू. तुम्ही कोपरगावात येऊ नका, असं सांगितलं असल्याचं नितीन साबळे यांनी सांगितलंय.

उद्योगविश्वाचा ध्रुवतारा निखळला! ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

मात्र फकीरा चंदनशिव नामक समाज बांधवाला कोल्हेंच्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळी उपोषणाला बसवले त्यावेळी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा शासकीय अनावरण कार्यक्रमाला आले पाहिजे, असा आग्रह धरायला लावला होता. परंतु कार्यक्रम रद्द होताच फकीरा चंदनशिव उपोषण सोडून उठलाच कसा? असा प्रश्न उपस्थित होत असून त्यामुळे यामध्ये सुद्धा कोल्हे कुटुंबाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हात आहे, असा मातंग समाजाकडून आरोप करण्यात आला आहे.

जर फकीरा चंदनशिव उपोषणावरून उठलाच नसता तर मातंग समाजाला देखील वाटले असते की, तो स्वत: उपोषणाला बसला आहे मात्र उद्देश साध्य होताच त्याचे उपोषण अर्ध्यात सोडणे म्हणजेच त्याला कोणी तरी उपोषणाला बसवत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मातंग समाजाची आमदार काळे यांना विनंती आहे की, आचारसंहिता लागू होत नाही तोपर्यंत लवकरात लवकर हा अनावरण सोहळा होत असेल तर प्रयत्न करावे सर्व मातंग समाज बांधव तुमच्या बरोबर आहे. ज्यांनी हा कार्यक्रम होऊन दिलेला नाहीये त्यांना मातंग समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असे नितीन साबळे यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version