Download App

Lalit Patil Drugs Case : नाशिकच्या गिरणा नदीत सापडलं कोट्यावधींचं ड्रग्ज! मध्यरात्री पोलिसांची शोधमोहिम

Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात राज्यातील (Lalit Patil Drugs Case) राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. ससून रुग्णालायातून पसार झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली. त्याच्या काही साथीदारांनाही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी सुरू असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. देवळा तालुक्यात असलेल्या गिरणा नदीपात्रात ड्रग्जचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ललित पाटीलच्या साथीदाराकडे केलेल्या चौकशीतून ही माहिती समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत हा ड्रग्जचा साठा ताब्यात घेतला.

आता पालघरमध्येही ड्रग्जचा कारखाना; मिराभाईंदर एलसीबीकडून पर्दाफाश

पोलिसांनी चौकशी करत खात्री केली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या टीमला रात्री दोन वाजता नदीत अंडरवॉटर कॅमेऱ्याच्या मदतीने ड्रग्जच्या गोण्या सापडल्या होत्या. त्यानंतर आज सकाळी देखील नदीत फेकून दिलेले ड्रग्ज शोधण्याचे काम सुरुच आहे. मध्यरात्री अडीच वाजचा देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील नदीपात्रात शोधमोहिम सुरू करण्यात आली. पोलिसांच्या मदतीला रायगडमधील प्रशिक्षित स्कूबा डायव्हिंगचे पथकही होते. आतापर्यंत दोन गोण्यातून सुमारे 50 किलो ड्रग्ज नदीत फेकल्याचे तपासादरम्यान समोर आले. कॅमेऱ्याच्या माध्यमातून या ड्रग्जचा शोध घेण्यात आला. मात्र,15 ते 20 फुट खोल असल्याने या ड्रग्जचा साठा बाहेर काढण्याचे काम अजूनही सुरुच असल्याचे सांगण्यात आले. या ड्रग्जची किंमत अंदाजे शंभर कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगरातून 500 कोटींचं कोकेन जप्त 

दोन दिवसांपूर्वी गुजरातमधील अहमदाबाद गुन्हे अन्वेषण शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) कडून मोठी महाराष्ट्रात मोठी कारवाई करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरमधील एका कारखान्यावर छापा मारुन कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. तब्बल 500 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.  छत्रपती संभाजीनगरमधील कारखान्यात रसायनांची निर्मिती दाखवून ड्रग्ज तयार केली जात असल्याचे तपासात समोर आले होते. गुजरात पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्यानंतर या ड्रग्जचा पुरवठा कुठे केला जात होता, यासंदर्भात पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे देशभरातील उच्च सुरक्षा यंत्रणाही अॅक्टिव झाल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधून 500 कोटींचं कोकेन जप्त; गुजरात पोलिसांची मोठी कारवाई

Tags

follow us