Download App

बिबट्या आला रे! नगर शहरात युवकावर प्राणघातक हल्ला; परिसरात घबराट

अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव या गजबजलेल्या (Leopard Attack) ठिकाणी बिबट्याने एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

अहिल्यानगर : गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यामध्ये बिबट्याकडून नागरिकांवर हल्ले झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच काहीसा धक्कादायक प्रकार नगर शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव या गजबजलेल्या (Leopard Attack) ठिकाणी बिबट्याने एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

ही धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. बोल्हेगावला जोडणाऱ्या सीना नदीवरील पुलाजवळ बिबट्याने युवकाव हल्ला केला. या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे. तसेच या नदीजवळ बाहेर राज्यातील लोक मोठ्या कामाला आलेले आहेत तिथे त्यांची लोकवस्ती आहे. बिबट्याने अक्षय चंद्रशेखर गुंजाळ या युवकावर प्राणघातक हल्ला केला त्याच्या पायाला बिबट्याने चावा घेतला आहे.

धक्कादायक! मनपा आरोग्य अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरवर बिबट्याचा हल्ला, नगरमध्ये खळबळ

दरम्यान भर वस्ती व वर्दळीचे ठिकाण असलेल्या भागामध्ये बिबट्यांकडून हल्ला झाल्याच्या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नगर शहरात तसेच बोल्हेगाव परिसरातील लोकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. जखमी अक्षय गुंजाळ याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने वन्यप्राणी थेट मानवी वस्तीत हल्ले करू लागल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

याआधीही नगर शहरालगत असणाऱ्या चांदबीबी महाल परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलं होतं. अनेकांनी चांदबीबी महाल परिसरात बिबट्या पाहिलाही होता. त्यानंतर आता नगर शहरातच बिबट्याने प्रवेश केल्याने वन विभाग आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे. भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात तो मानवी वस्तीत आला आहे. सावेडी भागात बिबट्या याआधी दिसला होता. आता बोल्हेगावातही बिबट्यांचा संचार सुरू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात बिबट्यांची दहशत वाढली; बिबट्यांना रोखण्यासाठी आमदार तांबेंनी केली ‘ही’ मागणी

follow us