राज्यात बिबट्यांची दहशत वाढली; बिबट्यांना रोखण्यासाठी आमदार तांबेंनी केली ‘ही’ मागणी

राज्यात बिबट्यांची दहशत वाढली; बिबट्यांना रोखण्यासाठी आमदार तांबेंनी केली ‘ही’ मागणी

MLA Satyajit Tambe demand for Sterilization of leopards : राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा एकदा बिबट्याने (leopards) हजेरी लावल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचे हल्ले व बिबट्याची दहशत ही बाब ग्रामीण भागात नित्याचीच झालीये. लोकवस्ती असलेल्या ठिकाणी देखील त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला असून बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये वन्यप्राण्यांसह, शेतकरी, सामान्य माणूस तसेच लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. यात अनेकांचे प्राण देखील गेले आहेत.

आशा सेविकांना 10 लाखांचा अपघाती विमा ते दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण; मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय!

याच पार्श्वभुमीवर आमदार सत्यजीत तांबेंनी (MLA Satyajit Tambe) राज्याच्या वन मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. वन विभागाने पकडलेल्या बिबट्यांची लगेच त्याच ठिकाणी नसबंदी (Sterilization) करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्रशासनाकडे तातडीने पाठवण्याची मागणी आ. सत्यजीत तांबेंनी केली आहे.

Union Budget 2024 नंतर पुण्यात ग्राहकांची झुंबड; जाणून घ्या प्रमुख शहरातील सोन्याचे दर

राज्यात बिबट्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून जास्त लोकस्वस्ती असलेल्या ठिकाणी देखील त्यांचा वावर वाढलेला आहे. तसेच बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये शेतकरी, सामान्य माणूस तसेच लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी हल्ले झाले असून त्यामध्ये लहान मुलांचे प्रमाण खूप आहे व बहुतांशी मुलांचा मृत्यू देखील झाल्याचे आ. सत्यजीत तांबेंनी पत्रात म्हंटले आहे.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील दीड वर्षाची ओवी सचिन गडाख हिच्यावर बिबट्याचा हल्ला झाला व त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतात पाणी भरायचं असेल किंवा काही काम करायचे असेल तर त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे वनविभागाने पकडलेल्या बिबट्यांची नसबंदी करणे गरजेचे आहे. याच संदर्भात आ. सत्यजीत तांबेंनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली होती.

या भेटीत केंद्र शासनाने बिबट्यांची नसबंदी करण्याची परवानगी देण्याची मागणी आ. तांबेंनी केली होती. परंतु, राज्य शासनाने याबाबतचा प्रस्ताव पाठविल्यास केंद्र शासन त्याबाबतचा सकारात्मक विचार करून मंजुरी देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने याबाबतचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवावा, अशी मागणी आ. सत्यजीत तांबेंनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube