Union Budget 2024 नंतर पुण्यात ग्राहकांची झुंबड; जाणून घ्या प्रमुख शहरातील सोन्याचे दर
Union Budget 2024 Gold rate decrease customers hurry in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात सत्तेत आलेल्या एनडीए सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प (Union Budget 2024 ) सादर झाला आहे. यंदाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीच (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सोन स्वस्त ( Gold rate) झालं आहे. त्यामुळे पुण्यामध्ये ग्राहकांनी सराफा बाजारात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
… अन्यथा जनप्रक्षोभाला सामोरे जा, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
पुण्यामध्ये सोन्याच्या दरामध्ये सोनं जवळपास 3 हजार रूपायांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. काल सोमवारी सोन्याचा भाव 73 हजार 200 रूपये तोळा एवढे होता. आता तो 70 हजार झाला आहे. तसेच चांदी जवळपास किलोमागे 5 हजारांनी स्वस्त झाली आहे. अशी माहिती पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक रांका ज्वेलर्स यांनी दिली. त्यामुळे पुणे आणि जळगाव शहरामध्ये महिलांसह ग्राहकांना दोन तासातच प्रति तोळा सोने मागे तीन हजार रुपयांचा फायदा झाला त्यामुळे या अर्थसंकल्पावर ग्राहकांनी समाधान व्यक्त केलं.
‘लापता लेडीज’ किरण रावमुळे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा, म्हणाली…
…म्हणून स्वस्त झालं सोनं
या अर्थसंकल्पांमध्ये सरकारकडून अनेक वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. ज्यामध्ये सोन्या आणि चांदीवरील कस्टम ड्युटी घटवून सहा टक्के करण्यात आली आहे. तसेच प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटीमध्ये 6.4% घट करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे तीनही धातू आणि त्यांच्यापासून बनवलेल्या दागिने आणि वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत.
कोणत्या शहरात सोन्याचे दर कीती?
वाशिम –
सोने ( प्रति तोळा)-
आधी 73 हजार 500
आता 70,हजार 500
चांदी (प्रति किलो) –
आधी 92 हजार
आता – 86 हजार
हिंगोली –
सोने ( प्रति तोळा)-
आधी 74 हजार
आता 71 हजार 700
चांदी( प्रति किलो) –
आधी 92 हजार
आता 88 हजार
पुणे –
सोने (प्रति तोळा) –
आधी 72 हजार 500
आता 69 हजार 500
चांदी (प्रति किलो) –
आधी 89 हजार 600
आता 85 हजार 600
गोंदिया –
सोने (प्रति तोळा) –
आधी 73 हजार 500
आता 69 हजार 500
चांदी (प्रति किलो) –
आधी 92 हजार
आता 87 हजार 590