आशा सेविकांना 10 लाखांचा अपघाती विमा ते दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण; मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय!

आशा सेविकांना 10 लाखांचा अपघाती विमा ते दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण; मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय!

CM Shinde cabinet Meeting many Decisions : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde ) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक (cabinet Meeting) पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील विविध घटकांसाठी विविध महत्त्वाचे निर्णय (Decisions) घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

Union Budget 2024 नंतर पुण्यात ग्राहकांची झुंबड; जाणून घ्या प्रमुख शहरातील सोन्याचे दर

या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तसेच त्यांना अपघाती मृत्यूस दहा लाख तर अपंगत्वास पाच लाख रूपये अशी विमा रक्कम देऊ केली जाणार आहे. त्याचबरोबर राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आरक्षण देण्यात येणार आहे.

… अन्यथा जनप्रक्षोभाला सामोरे जा, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

तसेच या बैठकीत‘राजे यशवंतराव होळकर महामेष’ ही योजना कायम ठेवण्यात आली आहे. तर आता या योजनेतील लाभार्थी मेंढपाळांच्या थेट खात्यात रक्कम जमा होणार आहे. शेतीपिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. दुसरीकडे बृहन्मुंबईत न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिका भाडेतत्वावर देण्यात येणार असून नाशिकच्या अंबड एमआयडीसीसाठी 16 हेक्टर शासकीय जमीन देण्यात येणार आहे. असे महत्त्वपूर्ण निर्णया या बैठकीत घेण्यात आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube