Download App

सावधान! बिबट्या येतोय, वनविभाग झाला सतर्क; नागरिकांना महत्वाचं आवाहन

Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्याच्या सर्वच भागात बिबट्याचा (Leopard)वावर असून उसाची शेती हे बिबट्याचे प्रामुख्याने अधिवास बनलेले आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरु झाला आहे. मागील 10 ते 15 दिवसांमध्ये जिल्ह्यात (Ahmednagar)वेगवेगळ्या ठिकाणी तीन लहान बालकांना बिबट हल्यामध्ये आपला जिव गमवावा लागला आहे. त्यामुळे ऊसतोड करत असताना शेतकरी (farmer)व मजुरांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी केले आहे.

Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यानंतर एकनाथ शिंदे मराठा स्ट्राँगमॅन झालेत का?

जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये ऊसतोड हंगाम सुरु आहे. उसतोड सुरु असताना मजुरांनी व संबंधीत शेतकऱ्यांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अनेकदा त्यांना ऊसतोड सुरू असलेल्या भागातच खेळायला मोकळे सोडले जाते. ज्या ठिकाणी मुलांना ठेवले जाते, तिथे हातात घुंगराची काठी घेऊन मोठ्या व्यक्तीस थांबवावे. जेणेकरून बिबट्या दिसल्यास मुलांची सुरक्षा करता येते.

अखेर नितीश कुमार भाजपसोबत जाणार! उद्या शपथविधी? ‘या’ कारणांमुळं धरली एनडीएची वाट

तसेच सुरक्षेच्या कारणास्तव खुप वाकून ऊसतोड करु नये. अशावेळी दुसराच एखादा प्राणी आहे असे समजून बिबट्याचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो. ऊसतोड सुरु असताना ट्रक्टरमधील टेपरेकॉर्डरवर किंवा चांगल्या वायरलेस ब्लूटूथ स्पीकरचा वापर करुन मोठ्या आवाजात गाणी सुरु ठेवावीत, यामुळे बिबट्या जवळ येण्याची शक्यता कमी होते.

ऊसतोड किंवा शेतीची कामे करत असताना समुहाने कामे करावी. एकट्या व्यक्तीने ऊसतोड किंवा शेतीची कामे करु नयेत. गावाजवळ, जंगलात, शेतात अथवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यासाठी गर्दी करु नये. बिबट तसेच बिबट्याची पिल्ले आढळल्यास तात्काळ सबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील वनविभागाच्या वतीने नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

follow us