अखेर नितीश कुमार भाजपसोबत जाणार! उद्या शपथविधी? ‘या’ कारणांमुळं धरली एनडीएची वाट

  • Written By: Published:
अखेर नितीश कुमार भाजपसोबत जाणार! उद्या शपथविधी? ‘या’ कारणांमुळं धरली एनडीएची वाट

Bihar Politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे आज संध्याकाळपर्यंत राजीनामा देऊन रविवारी भाजपसोबत (BJP) आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात, अशी सुत्रांची माहिती आहे. दरम्यान नितीश कुमार यांना इंडिया आघाडीतून एनडीएमध्ये (NDA) सहभागी होण्यासाठी कोणी प्रेरित केलं? नेमक्या अशा काय घडोमाडी घडल्या की, नितीश कुमार हे भाजपसोब जात आहे. तर याचं कारण आहे. अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि पंतप्रधान मोदी. अयोध्येतील सोहळ्यामुळं भाजप आणि मोदींची हवा असल्याचं नितीश कुमार यांच्या लक्षात आल्याने ते भाजपसोबत जात असल्याचं बोलल्या जातं.

Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यानंतर एकनाथ शिंदे मराठा स्ट्राँगमॅन झालेत का? 

सूत्रांनी सांगितले की नितीश कुमार यांना इंडिया आघाडीत असुरक्षित वाटत होते. कारण प्रशांत किशोर यांच्यासह अनेक राजकीय तज्ञ म्हणाले होते की, JDU विरोधी आघाडीत राहिल्यास बिहारमध्ये त्यांना पाच जागाही मिळणार नाहीत. जेडीयूने पाचपेक्षा जास्त जागा जिंकल्यास देशाची माफी मागू, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला होता. तसेच नितीश कुमार यांना असे वाटते की इंडिया इंडियात आपलं राजकीय भविष्य उज्ज्वल दिसत नाही. त्यांनी इंडिया आघीडीच्या स्थापनेचे नेतृत्व केले, परंतु युतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनण्यात ते अयशस्वी झाले. त्यामुळं नितीश कुमार नाराज होते.

सरकारकडून घटनेचे धिंडवडे, ओबीसी अध्यादेशाविरोधात कोर्टात लढणार; प्रकाश शेंडगे आक्रमक 

INDIA आघाडीत नितीश कुमारांकडे दुर्लक्ष?

INDIA आघाडीत नितीश कुमारांकडे कायम दुर्लक्ष करण्यात आलं. बेंगळुरूमधील इंडियाच्या दुसऱ्या बैठकीत हे स्पष्टपणे दिसून आलं की, जेव्हा नितीश कुमार पत्रकार परिषदेला उपस्थित न राहता पटन्याला परतले. तर मुंबईतील तिसऱ्या बैठकीतही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर लगेचच, नितीश कुमार यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सीपीआयच्या रॅलीमध्ये जागावाटपाच्या विलंबासाठी आणि इंडिया आघाडीच्या कामकाजाकडे लक्ष न दिल्याबद्दल काँग्रेस पक्षावर जाहीर टीका केली होती.

आरजेडी-काँग्रेसशी असलेले संबंध ताणले
बिहारमध्ये नितीश कुमार यांचे राजद आणि काँग्रेसशी असलेले सबंध ताणलेले आहेत. त्यामुळं महाआघाडीपेक्षा एनडीएमध्ये आपल्या पक्षाचे भवितव्य अधिक उज्ज्वल आहे, असा त्यांना वाटलं. याआधीही ते भाजपच्या मदतीने प्रदीर्घ काळ बिहारचे मुख्यमंत्री राहिले. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात ते केंद्रीय मंत्रीही होते.
याशिवाय, तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या जाहीर सभांकडे दुर्लक्ष केल्यानही नितीश कुमार नाराज होते.

तेजस्वी जेडीयू तोडू शकतात
तेजस्वी यादव जेडीयू तोडून बिहारमध्ये सरकार स्थापन करू शकतात अशाही अफवा पसरल्या होत्या. त्यामुळं नितीश कुमार यांनी पक्षाची कमान हाती घेतली आणि लालनसिंग यांना हटवून ते जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. राम मंदिराच्या उभारणीनंतर भाजपला आलेल्या समर्थनाच्या लाटेसह हे सर्व मुद्दे नितीशकुमार यांच्या महाआघाडीतून बाहेर पडण्याच्या इच्छेला बळ देऊ शकतात. कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीदिनी, नितीश कुमार यांनी एका सभेला संबोधित करताना, घराणेशाहीच्या मुद्द्यावरून राजदवर जोरदार टीका केली.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज