भाजपसोबत जाण्याच्या तीन पत्रावर रोहित पवारांच्या सह्या: आमदार शेळकेंनी तारखाही सांगितल्या
Sunil Shelke On Rohit Pawar : रोहित पवार (Rohit Pawar) स्वत:च्या काकाचे नाही होऊ शकत तर सर्वसामान्य अन् आमचे काय होतील, असा घणाघात अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनिल शेळके बोलत होते. यावेळी शेळकेंनी राष्ट्रवादीच्या (Ncp) फुटीबाबत मोठ-मोठे गौप्यस्फोटही केले आहेत. त्यामुळे आता अजित पवार आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये धुमश्चक्री होणार असल्याची शक्यता आहे.
IPL 2024 : लिलावाआधी मोठी बातमी! ‘केकेआर’ने ‘या’ खेळाडूला दिली संघाची कमान
सुनिल शेळके म्हणाले, अजितदादांनी माझ्यासारख्या आमदारांना खूप मदत केली आहे. रोहित पवारांनाही कर्जत-जामखेड मतदारसंघात दादांनी मदत केली आहे. ताकद दिली, विकासकामांसाठी भरघोस निधी दिला पण रोहित पवार स्वत:च्या काकाचे होऊ शकत नाही ते सर्वसामान्यांचे आणि आमतचे काय होतील, या प्रक्रियेत सत्य परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर जयंत पाटलांना विचारा, असंही सुनिल शेळके म्हणाले आहेत.
राज्यात स्वयंघोषित संघर्षयोद्धा म्हणून युवा संघर्ष यात्रा उभी केली. अशा रोहित पवारांना दादांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. सध्याची परिस्थिती सर्वांना माहिती आहे. 20 जुलै 2022 ला मविआचं सरकार कोसळतं हे लक्षात आल्यानंतर 22 जुलैला दादांच्या दालनात सर्वपक्षीय प्रमुख तत्कालीन मंत्री 45 ते 47 आमदार उपस्थित होते. त्यावेळी सर्वांनी निर्णय घेतला की, दादा आपल्याला सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत. तेव्हा स्वत:हून नेत्यांनी सह्या करुन दादांच्या हाती पत्र दिलं. तेव्हा माझ्यासमोर रोहित पवारांनी दादांना पत्र सही करुन दिलं असल्याचा गौप्यस्फोटही सुनिल शेळकेंनी केला आहे.
‘ओबीसी नेत्यांना नाव ठेवणार नाही ‘हा’ एकच बोलतोयं’; जरांगेंकडून भुजबळांचा पुन्हा एकेरी उल्लेख
त्यानंतर अजितदादांनी भूमिका घेतली की, साहेबांची तुम्ही परवानगी घेऊन आपण निर्णय घेऊ. त्यावेळी रोहित दादांच्या नेतृत्वात आम्ही साहेबांना भेटायला गेलो. साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर दादांना विरोधी पक्षनेते करण्याचं ठरलं. आम्ही सर्व आमदारांनी सह्या करुन पत्र दिलं . त्यावेळी आम्ही 30 ते 32 आमदारांनी सह्या केल्या होत्या. सत्तेत जाण्यासाठी 52 आमदारांनी सह्या केल्या होत्या. सत्तेत जायचं म्हणून 22 जूनला सह्या घेतल्या तर 1 जुलैला विरोधी पक्षनेत्याच्या सह्या वाय.बी सेंटरला घेतल्या होत्या. महायुतीत जेव्हा आम्ही गेलो तेव्हा रोहित पवारांना विचारलंही नसल्याचं सुनिल शेळकेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, सत्तेत जाण्यासाठी रोहित पवार यांनी अजितदादांना सह्या करुन दिल्या होत्या. त्यामुळे आता रोहित पवारांना त्यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही उगाचच खोट्या वल्गना करुन नका, त्या थांबवा आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचा खोचक सल्ला सुनिल शेळकेंनी रोहित पवारांना दिला आहे.