Download App

Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या घरात बिबट्या; कुत्र्यावर हल्ला करुन केली शिकार…

Indurikar Maharaj : सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या घरात बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे. या बिबट्याकडून इंदोरीकर यांच्या पत्र्याच्या शेडमधील कुत्र्याची करतानाचं दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. इंदोरीकर महाराज यांच संगमनेरमधील ओझर गावात घर आहे. याच घरात बिबट्याने प्रवेश केल्याचं समोर आल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच रॉकेट्री टीमचा मोठा उपक्रम, तब्बल ६० चिमुकल्यांचं आयुष्यचं बदलणार

राज्यभरातील वारकऱ्यांचं आपल्या कीर्तनातून प्रबोधन करणारे इंदोरीकर महाराज यांचं घर संगमनेरमध्ये आहे. त्यांच्या घरासमोर एक पत्र्याचं शेड असून या पत्र्याच्या शेडमध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्याने प्रवेश केला होता. बिबट्याने प्रवेश केला तेव्हा पत्र्याच्या शेडमध्ये कुत्रे झोपलेल्या अवस्थेत होते. त्याचवेळी बिबट्याने एका कुत्र्याला उचलून नेलं असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.

Maharashtra Rain Update : येत्या 48 तासांत या भागांमध्ये बरसणार परतीचा पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचं स्पष्ट चित्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहेत. ज्यावेळी बिबट्या येतो त्याचवेळी या बिबट्याने झोपलेल्या अवस्थेत असलेल्या कुत्र्यावर बिबट्या जोराचा हल्ला करतो. हल्ला केल्यानंतर बिबट्या कुत्र्याला आपल्यासोबत घेऊन पळून जात असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, इंदोरीकर महाराजांच्या घरात बिबट्या घुसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांकडून जोरदार प्रतिक्रिया दिल्या जात असून या घटनेमुळे संगमनेर परिसरात नागरिकांमधून भीती व्यक्त केली जात आहे.

Tags

follow us