Download App

Lok Sabha Election : 2024 साठी खडसेंची मोठी घोषणा! तिकीट मिळाल्यास रावेरमधून लढणार

Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वारे जोरात वाहू लागले आहेत. या निवडणुकांनंतर राज्यात विधानसभेच्याही निवडणुका होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनीही तिकीटासाठी पक्षाकडे मागणी सुरू केली आहे. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळालं तर मी रावेरमधून लोकसभा निवडणूक लढणार आहे, अशी इच्छा खडसे यांनी व्यक्त केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) जळगाव दौऱ्यावर आले होते. त्यावेळी खडसे यांनी ही इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे, यावेळी बोलताना पाटील यांनीही खडसेंनी आता रावेर लोकसभेचा धनुष्यबाण उचलावा अशी इच्छा व्यक्त केली होती.

‘साखळी उपोषण सुरूच राहणार; विश्वासघात केला तर नाड्या आवळू’; मनोज जरांगेंनी ठणकावून सांगितलं

यानंतर खडसे म्हणाले, की मी लोकसभा निवडणूक लढण्यास फारसा उत्सुक नाही. पण, पक्षाने जबाबदारी दिली तर ही जबाबदारी पार पाडेन. खडसे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या मतदारसंघात सध्या रक्षा खडसे या भाजपाच्या विद्यमान खासदार आहेत. जर राष्ट्रवादी काँग्रेसने खडसेंना लोकसभेचे तिकीट दिले तर या मतदारसंघात एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे असा सामना पहायला मिळू शकतो.

रावेरमध्ये काँग्रेस अपयशी 

रावेर लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस आणि भाजप असाच सामना झाला आहे. 1989 मध्ये हा मतदारसंघ तयार झाला तेव्हापासून आतापर्यंत पोटनिवडणुकांसह रावेरमध्ये एकूण 10 निवडणुका झाल्या. यापैकी 9 मध्ये काँग्रेसचा पराभव झाला. फक्त एकदाच यश मिळाले. काँग्रेसने फक्त 13 महिन्यांसाठी हा मतदारसंघ ताब्यात घेतला होता. त्यामुळे आता या मतदारसंघात बदल करावा. काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला द्यावी अशी मागणी केली होती. जागावाटपाबाबत अद्याप इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतरच ही बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीतच ठरेल की हा मतदारसंघ कुणाला द्यायचा.

Tags

follow us