Download App

पारनेरमधील पैसे वाटपावर अण्णा हजारे स्पष्टच बोलले, ‘पैशाच्या जोरावर देश चालला…’

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मतदानासाठी पैसे वाटप केल्याचा आरोप केला. यावर आता समाजसेवक अण्णा हजारेंनी भाष्य केलं.

Anna Hazare PC : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Elections) विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मतदानासाठी पैसे वाटप केल्याचा आरोप केला. यावर आता समाजसेवक अण्णा हजारेंन(Anna Hazare) भाष्य केलं. मतदानसाठी पैशाचा वापर होणं याच्यासारखं दुर्दैव नाही, अशी प्रतिक्रिया हजारेंनी दिली.

निवडणुकीच्या लाइव्ह कव्हरेजसाठी गेलेल्या पत्रकाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, निवडणुकीत मतदानासाठी पैशांच वाटप होत असेल तर हे देशाचं दुर्दैव आहे. मतदानसाठी पैशाचा वापर होणं याच्यासारखं दुर्दैव नाही. तुम्ही पैसे वाटत असाल तर या देशाच्या स्वतांत्र्यासाठी लोकांनी बलिदान केलं, त्याचं काय ? पैशाच्या जोरावर देश चालला तर देशातील लोकशाही संपून जाईल, अशी भीती हजारेंनी व्यक्त केली.

श्रीकांतनंतर Rajkumar Rao पुन्हा सज्ज; ‘मिस्टर अँड मिसेस माही’चा ट्रेलर आऊट 

पुढं बोलतांना अण्णा हजारे म्हणाले, या देशासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे, तुरुंगवास भोगला आहे, फासावर गेलेत. ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर मतदारांची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. जागृत मतदार हाच लोकशाहीचा आधार आहे. ज्या दिवशी मतदार जागृत होतील, त्याच दिवशी देशात खऱ्या अर्थाने लोकशाही येईल, असेही अण्णा हजारे म्हणाले.

अण्णा हजारे म्हणाले, ज्यांना मतदान करायचे त्यांनी मागच्या काळात काय केले ते पाहणं महत्त्वाचे आहे. आपण ज्या उमेदवाराला मतदान करतो तो चारित्र्यवान, विचारी आणि स्वच्छ प्रतिमेचा असावा. तो मतदारसंघासाटी किती झिजला, हे पाहूनच मतदान करा, असा सल्ला अण्णा हजारेंनी मतदारांन दिला.

उमदेवारावर काही डाग लागलेले नाहीत ना, हेही पाहिलं पाहिजे. हा देश कोणी चालवायचा त्याची चावी कोणाच्या हातात द्यायची हे ठरवायचं आपल्या हातात आहे. चावी चुकीच्या हातात पडली तर देश उद्ध्वस्त होईल, असंही हजारे म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज