Download App

Ahmednagar LokSabha : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार ? लंकेंची गुगली

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi will come to fill candidature of Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभा (Ahmednagar Lok Sabha) मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) विरुध्द मविआचे उमेदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात लढत होणार आहे. उमदेवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरूवात झाली आहे. दोन्ही उमेदवार लवकरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. दरम्यान, लंकेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वत: राहुल गांधी येणार असल्याचे वृत्त आहे.

दुबईत पावचासा हाहाकार! 75 वर्षांत अस पहिल्यांदाच घडलं, कशामुळे झाला इतका पाऊस? 

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची निलेश लंके यांनी दिली आहे.

निलेश लंके यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, माझा उमेदवारी अर्ज दाखल करायला स्वत: राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे येऊ शकतात. कालचं माझं राहुल गांधीशी बोलणं झालं आहे. शक्यतो, मीच उमेदवारी अर्ज दाखल करायला येतो असं त्यांनी मला सांगितल्याचं लंके म्हणाले.

तुमच्यात साखर कारखाना चालवण्याची धमक नाही… सांगलीत विशाल पाटलांवर अजित पवारांचा घणाघात   

लंकेंनी राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करायला येतील असं सांगितलं असलं तरी नगर व शिर्डी दोन्हीकडे काँग्रेसचे उमेदवार नाहीत. त्यामुळं ते येण्याची शक्यता फारच कमी आहे. राहुल गांधींनी विदर्भातील काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. मात्र,त्यांचे अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी आले नव्हते. आजही पुण्यात काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठीही राहुल गांधी आले नव्हते. त्यामुळे लंके यांनी ही गुगली टाकली की, राहुल गांधी खरोखर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

शरद पवार उद्या नगरमध्ये
दरम्यान, निलेश लंके यांची स्वाभिमानी जनसंवाद यात्रा उद्या संपणार आहे. या वेळी अहमदनगरमध्ये शरद पवार, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच नगरच्या दौऱ्यावर येणार आहेत.

follow us