Download App

अहमदनगरमधील दुसरे माजी आमदार अडचणीत; सुनेच्या नावावर पिचड यांनी कोट्यावधी हडपल्याचा आरोप

मधुकर पिचड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पिचड यांनी सुनेचे सुमारे पाच कोटी रुपये हडपल्याचा दावा वकील असीम सरोदेंनी केला.

  • Written By: Last Updated:

Madhukar Pichad : माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पिचड यांनी त्यांची दुसरी पत्नी आदिवासी नसतानाही बनावट आदिवासी जात प्रमाणपत्र बनवले. त्या आधारे त्यांनी आपल्या सुनेची मालमत्ता हडप केली. तसेच जमीन अधिग्रहण कायद्यानुसार, सुनेला मिळणे अपेक्षित असलेलले सुमारे पाच कोटी रुपये दुसऱ्या पत्नीला मिळण्यासाठी कागदपत्रे तयार केली, असा आरोप सुनेचे वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

Rajarani Trailer: गुलीगत सूरज चव्हाणच्या ‘राजा राणी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच 

राष्ट्रवादीमधून भाजपात प्रवेश केल्यानंतर मधुकर पिचड हे अनेक महत्वाच्या पदांपासून दूर आहेत. अशातच आता पिचड यांच्याविरोधात त्यांच्या सुनेने गंभीर आरोप केलेत. पत्नी कमल पिचड या हिंदू मराठा असतांना मधुकर पिचड यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांचे आदिवासी जात प्रमाणपत्र तयार केले, त्याच वेळी सून सरोज जितेंद्र पिचड यांच्या अनेक कागदपत्रांवर जबरदस्ती सह्या घेत स्वत:च्या ओळखींचा फायदा घेऊन सरकारी रेकॉर्डमध्ये फेरफार केले. बनावट आदिवासी प्रमाणपत्राच्या आधारे कमल पिचड यांच्या नावाने जमिनी फेरफार घेतल्या. याबाबत अनुसूचित जाती-जमाती तपासणी समितीडे 2018 पासून तक्रारी आहेत. पण, सरकारी अधिकारी पिचड यांच्या दबावाखाली काम करत असल्याचं सरोदे म्हणाले.

नगरकरांनो सावध रहा, पुढील 3 दिवस जिल्ह्यात धो धो पाऊस, अलर्ट जारी 

सरोड पिजड यांच्या तक्रारीची पोलिसांकडून दखल नाहीच…
याप्रकरणी सरोज पिचड यांनी शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे कल्याणमधील जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या दाव्यात मधुकर पिचड, कमल पिचड आणि इतरांवर कारवाई का करू नये, याबाबतची नोटीस न्यायालयाने बजावली आहे. 25 ऑक्टोबर रोजी त्याबाबत सुनावणी होणार आहे.

घरगुती हिंसाचाराचेही आरोप
दरम्यान, सरोज पिचड यांनी मधुकर पिचड आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. तो दावा अद्याप प्रलंबित आहे, असे वकील सरोदे म्हणाले. याबाबत पिचड कुटुंबीयांशी संपर्क साधला गेला असता, प्रतिक्रिया उलब्ध झाली नाही.

 

follow us