सत्यजित तांबे घरवापसी करणार का ? ; बाळासाहेब थोरातांनी दिले ‘हे’ उत्तर

Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडल्या. काँग्रेसने तिकीट न दिल्याने आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष उभे राहिले अन् निवडूनही आले. आता ते अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार की काँग्रेसमध्ये जाणार ?  अशा चर्चा सुरू असतात. मात्र, सत्यजित तांबे यांनी आपला तसा कोणताही विचार नसल्याचे याआधीच स्पष्ट केले. […]

_LetsUpp

balasaheb thorat and satyajeet tambe

Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडल्या. काँग्रेसने तिकीट न दिल्याने आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष उभे राहिले अन् निवडूनही आले. आता ते अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार की काँग्रेसमध्ये जाणार ?  अशा चर्चा सुरू असतात. मात्र, सत्यजित तांबे यांनी आपला तसा कोणताही विचार नसल्याचे याआधीच स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेवर आज नगरमध्ये आलेले त्यांचे मामा माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनीही शिक्कामोर्तब केले.

बाळासाहेब थोरात आज काँग्रेस पक्षाने मोदी सरकारविरोधात सुरू केलेल्या आंदोलनासाठी नगर शहरात आले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडली.

शिवतारेंनी दोन गावे फोडली : फुरसुंगी, उरुळी देवाची पुणे महापालिकेतून बाहेर!

या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांनी आमदार सत्यजित तांबे यांच्याबाबत प्रश्न विचारला. तांबे हे भाजपाच्या नेत्यांबरोबर बराच वेळा दिसत असल्याचेही पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर थोरात म्हणाले, की सत्यजित अपक्ष आहे. अपक्षाला कोणताही पक्ष नसतो. त्याने यासंदर्भात आधीच ट्विट केले आहे. ते तुम्ही एकदा  तपासून पहा. तो काँग्रेसमध्ये वाढल आहे. काँग्रेसचा विचार  त्याच्यात रुजला आहे. त्यामुळे निर्णय त्यालाच घ्यायचा आहे असे थोरात यावेळी म्हणाले.

मोदींनीच चोरांची यादी जाहीर केलीय ना ? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पदवीधर निवडणुकीतील उमेदवरीवरून पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. याबाबत योग्य वेळी निर्णय होईल, असे सूचक वक्तव्य थोरात यांनी केले.

दरम्यान, आ. थोरात यांनी पत्रकारांनी विचारेलल्या प्रश्नांना थेट उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे आ. तांबे भाजपमध्ये जाणार की पुन्हा काँग्रेसमध्ये  येणार, त्यांची पुढील वाटचाल काय असणार हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले आहेत.

Exit mobile version