शिवतारेंनी दोन गावे फोडली : फुरसुंगी, उरुळी देवाची पुणे महापालिकेतून बाहेर!

शिवतारेंनी दोन गावे फोडली : फुरसुंगी, उरुळी देवाची पुणे महापालिकेतून बाहेर!

PMC New Changes Boundaries : माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अखेर खरे दाखवले आहे. पुणे महापालिकेची सुधारित सीमारेषा राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांना पुणे महापालिकेतून वगळण्यात आले आहे. राज्य शासनाने फुरसुंगी, उरुळी देवाची या गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी जे बोलून दाखवले होते. ते खरे करून दाखवले आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

राज्य शासनाचे उप सचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी पुणे महापालिकेच्या सुधारित सीमारेषा शुक्रवारी (दि. ३१) रोजी जाहीर केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना २०१७ साली पुणे महापालिकेत ११ गावांमध्ये उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळण्याची मागणी केली होती. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दोन गावे वगळण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार राज्य शासनाने तो निर्णय कायम ठेवत ही दोन गावे वगळण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

Kalaram Mandir : संयोगिताराजे भोसलेंचा अपमान करणाऱ्या महंतांवर कारवाई करा! – Letsupp

पुणे महानगरपालिका हद्दीतून वगळावयाचे क्षेत्र –
१) फुरसुंगी – स.नं. १९३, १९२ पै, १९४, १९५ पै (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपूर्ण महसुली गावाचे क्षेत्र.

२) उरूळी देवाची – स.नं. ३०, ३१ व ३२ पै, (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपूर्ण महसुली गावाचे क्षेत्र.

 

पुणे महानगरपालिकेची सुधारित हद्द

उत्तर – कळस, धानोरी व लोहगाव या महसुल गावांची हद्द.

उत्तर पूर्व – लोहगाव, वाघोली या महसुल गावांची हद्द.

पूर्व – मांजरी बु., शेवाळेवाडी, हडपसर या महसूली गावांची हद्द व फुरसुंगी महसुली गावातील कचरा डोपोची हद्द.

दक्षिण पूर्व – महंमदवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी या महसूली गावांची हद्द व उरूळी देवाची महसुली गावातील कचरा डेपोची हद्द.

दक्षिण – धायरी, वडाचीवाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी या महसूली गावांची हद्द.

दक्षिण-पश्चिम – पश्चिमेस नांदेड, खडकवासला, नांदोशी सणसनगर, कोपरे या महसुली गावांची हद्द.

पश्चिम – कोंढवे धाडवे, बावधन बु. व खुर्द, म्हाळुंगे, सुस या महसुली गावांची हद्द.

पश्चिम-उत्तर – बाणेर, बालेवाडी या महसुली गावांची हद्द व पुणे महानगरपालिकेची जुनी हद्द.

(248) Nitin Gadkari : गडकरींच्या डोक्यात ‘उजनी’साठी खास प्लॅन | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube