Sujay Vikhe replies Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार (Lok Sabha Election) तयारी सुरू आहे. जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून जागावाटपही जाहीर होईल. महाविकास आघाडीकडून भाजपला जोरदार टक्कर देण्याची भाषा केली जात आहे. मात्र, याआधीच भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा (Sanjay Raut) संदर्भ देत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आगामी निवडणुकीत आमच्या 600 पेक्षा जास्त जागा निवडून येतील असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर खासदार सुजय विखे यांनी खोचक उत्तर दिले.
संजय राऊत यांनी 2024 च्या निवडणुकीचा नाद सोडला असून त्यांनी 2029 च्या निवडणुकीची तयारी करत आहेत. महाविकास आघाडीची काल जी गुप्त बैठक झाली त्यात 2029 च्या निवडणुकीच्या अनुषंगानेच चर्चा झाली, असे खासदार सुजय विखे म्हणाले.
Ahmednagar News : नगर जिल्ह्यात 23 हजार रोजगार देणार, महसूलमंत्री विखेंची घोषणा
लोकसभेच्या अनुषंगाने भाजपाचा प्रवास लोकसभेच्या या कार्यक्रमाचे आयोजन नगर शहरात करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार विखे यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. आगामी निवडणुकांमध्ये 600 पेक्षा अधिक जागा निवडून येतील असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.
यावर बोलताना खासदार सुजय विखे यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की संजय राऊत यांनी 2024 च्या निवडणुकीचा नाद सोडला असून ते आता 2029 च्या निवडणुकीची तयारी करत आहेत. 2027 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होऊन खासदारांची संख्या वाढली जाईल या अनुषंगाने खासदार संजय राऊत बोलत होते.
Sujay Vikhe : मशाल घ्या, तुताऱ्या घ्या आणि वाजवा; खासदार विखेंची ठाकरे-पवारांवर टीका
तुम्हाला वाटत असेल की राऊत हे खोटे बोलतात मात्र ते सत्य बोलत आहेत. 2024 च्या निवडणुकीचा नाद महाविकास आघाडीने सोडून दिला आहे. महाविकास आघाडीची जी गुप्त बैठक झाली त्यामध्ये 2029 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी चर्चा केली अस टोला देखील यावेळी खासदार सुजय विखे यांनी लगावला.
जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात
जागावाटपाबाबत अंतिम चर्चा झाली आहे. महाविकास आघाडी, वंचित आघाडी महत्त्वाचा घटक आहे. 48 जागांवर चर्चा पूर्ण झाली आहे. कोणत्याही जागेवर मतभेद नाहीत. वंचित आघाडीचे नेते काही बैठकींमध्ये हजर होते, कालच्या बैठकीत देखील हजर होते. काल त्यांच्याकडून एक प्रस्ताव आलेला आहे. 27 जागांवर त्यांनी निवडणुकीची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे. आम्ही देखील केली आहे प्रत्येक पक्षाने केली आहे. यावर चर्चा करून काही निर्णय झालेले आहेत. वंचित बहुजन आघाडी हा देशातील हुकूमशाही विरोधात प्रभावी पक्ष आहे. वंचित आघाडीची जी हुकूमशाही विरोधात भूमिका आहे, तीच महाविकास आघाडीची भूमिका आहे.