Download App

धक्कादायक! मनपा आरोग्य अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरवर बिबट्याचा हल्ला, नगरमध्ये खळबळ

Ahmednagar News : मागील दोन दिवसांपासून नगर शहर आणि परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शहरातील काही भागात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने या भागात काळजी घेण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेनं केलं आहे. दरम्यान गुरुवारी (ता.१७) सकाळी नगर शहराजवळ असलेल्या सोनेवाडी परिसरात बिबट्याने अहमदनगर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचा ड्रायव्हर किरण भुजबळ यांच्यावर हल्ला केला.

किरण भुजबळ शेतीची मशागत करत असताना अचानक त्यांच्या ट्रॅक्टर समोर बिबट्या आला. ट्रॅक्टरच्या आवाजाने बिबट्या बिथरला. बिबट्या हल्ला करणार इतक्यात भुजबळ यांनी प्रसंगावधान ओळखून ट्रॅक्टर जोरात मागे घेतला आणि तेथून पळ काढत स्वतःचा जीव वाचवला. क्षणाचाही उशीर झाला असता तर भुजबळ यांचा जीव धोक्यात आला असता.

नगरकरांनो सावध राहा! शहरात बिबट्याचा वावर

याआधीही अहमदनगर शहरालगत असणाऱ्या चांदबीबी महाल परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलं होतं. अनेकांनी चांदबीबी महाल परिसरात बिबट्या पाहिलाही होता. त्यानंतर आता नगर शहरातच बिबट्याने प्रवेश केल्याने वन विभाग आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे.

याबाबत व्याघ्र संरक्षण समितीचे सदस्य मंदार साबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.बालिकाश्रम रस्त्यावरील जुन्या पंपिंग स्टेशन रस्त्यावर उसाच्या क्षेत्रात बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन नागरिकांना झालं आहे. उद्या प्रत्यक्ष पाहणी नंतर काय होते ते होईल स्पष्ट. नागरिकांनी तसेच या भागातील रहिवाशांनी उगाच घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन साबळे यांनी केले आहे.

दरम्याम, मागील दोन दिवसांपासून शहरात बिबट्याचा वावर आहे. भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात तो मानवी वस्तीत आला आहे. सावेडी भागात हा बिबट्या असल्याचे सांगण्यात येत होते. आता मात्र नगर तालुक्यातील सोनेवाडी भागात बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागपूरकरांना गुडन्यूज! सीएनजीच्या दरात मोठी घसरण; आता ‘इतक्या’ रुपयांत मिळतंय इंधन

Tags

follow us