Ajit Pawar NCP Party Worker Meeting in Ahmednagar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Ahmednagar Lok Sabha) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) वतीने जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन येत्या गुरुवारी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या मेळाव्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा नगर शहरातील केडगाव येथील निशा लॉन्स येथे होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्यावतीने विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून प्रचारास सुरवातही केली आहे. त्यासाठीच दि.४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे.
या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, प्रदेश युवा अध्यक्ष सूरज चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे नूतन राज्याध्यक्ष दत्तात्रय पानसरे, प्रदेश सचिव राजेंद्र गुंड, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आमदार अरुण जगताप, आ.संग्राम जगताप, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवा जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे आदी उपस्थित राहणार आहेत.